साई मंदिरात उद्या रुढी परंपरेनुसार दीपावली लक्ष्मीपूजन

साई मंदिरात उद्या रुढी परंपरेनुसार दीपावली लक्ष्मीपूजन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थान (Shri Saibaba Trust) विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने (Shirdi) सालाबादप्रमाणे याही वर्षी रुढी परंपरेनुसार दीपावली श्रीलक्ष्मीपूजन उत्सव (Diwali Srilakshmi Pujan celebration) गुरुवार दि. 4 नोव्हेंबर 2021 रोजी साजरा करण्यात येणार असून यावर्षी करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दीपावली श्रीलक्ष्मीपूजन उत्सव कोविड नियमांचे पालन (Adherence to covid rules) करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (CEO Bhagyashree Banayat) यांनी दिली.

श्रीमती बानायत (CEO Bhagyashree Banayat) म्हणाल्या, द करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा श्रीलक्ष्मीपूजन उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. दिपावलीनिमित्त (Dipawali) आज सायंकाळी 5 ते 6 या वेळेत समाधी मंदिराच्या गाभार्‍यात लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम होणार असून यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कुबेर पूजन, सरस्वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सायंकाळी 5 वाजता दर्शनरांग बंद करण्यात येईल. लक्ष्मी-कुबेर पूजन झाल्यानंतर सायंकाळी 6.15 वाजता श्रींची धुपारती होवून सायं.6.45 वाजता साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरु करण्यात येईल. रात्री 10.30 वाजता श्रींची शेजारती होणार आहे.

या दीपावली उत्सवानिमित्त शनि शिंगणापूर (Shani Shinganapur) येथील गणेश शेटे, शनैश्वर डेकोरेर्टस यांच्यावतीने देणगीस्वरुपात विद्युत रोषणाई करण्यात येणार असून शिर्डी येथील साईभक्त विजय तुळशीराम कोते यांच्या देणगीतून समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी व गुरूस्थान या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट (Attractive Floral Decoration) करण्यात येणार आहे. तसेच रतलाम येथील साईभक्त अनिल सिसोदिया, श्री साई सेवा समिती ट्रस्ट यांनी मंदिर परिसरात व प्रवेशव्दारावर आकर्षक रांगोळ्या काढणार आहे. दीपावली श्रीलक्ष्मीपूजन उत्सवाचे सर्व कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करुन करण्यात येणार असल्याचे श्रीमती बानायत (CEO Bhagyashree Banayat) यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com