साईबाबा संस्थानच्या भाग्यश्री बानायत नव्या सीईओ

साईबाबा संस्थानच्या भाग्यश्री बानायत नव्या सीईओ
सीईओ भाग्यश्री बानायत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी (Shirdi) येथील श्री साईबाबा संस्थानच्या (Shri Sai Trust) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) भारतीय प्रशासन सेवेतील महिला अधिकारी नागपूर (Nagpur) येथील रेशीम उद्योग महामंडळाच्या संचालिका (Director of the Silk Industry Corporation) भाग्यश्री बानायत (Bhagyashree Banayat) यांची नियुक्ती शासनाने केली आहे.

दरम्यान, शिर्डी (Shirdi) येथील श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Sai Baba Trust CEO) कान्हुराज बगाटे (Kanhuraj Bagate) यांची अखेर बदली (Transfer)झाली असून त्यांच्या जागेवर साईबाबा संस्थानचे (Sai Baba Trust) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत (IAS Bhagyashree Banayat) यांची नियुक्ती झाली आहे.

भाग्यश्री बानायत या 2012 च्या नागालँड येथील आयएएस अधिकारी असून याअगोदर नागपूर येथे रेशीम शेती महामंडळाच्या संचालकपदी त्या कार्यरत होत्या. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदलीबाबत शिर्डीचा परिसरात नेहमीच दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा होत असे. संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे वेध याप्रमाणे अनेकांना लागलेले होते. त्याचप्रमाणे नवीन अधिकारी संस्थांनला केव्हा येईल अशी चर्चा अनेक साईभक्त व नागरिकांमध्ये बोलली जात होती. अखेर राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानायत या थेट आयएएस असलेल्या महिला अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान राज्य शासनाने बदल्यांचे आदेश काढल्यानंतर शिर्डीकरांना नवीन अधिकारी संस्थानवर नियुक्त होत असल्याचे समजतात अनेकांनी समाधान व्यक्त केले.

तिसर्‍या महिला अधिकारी

शिर्डी श्रीसाईबाबा स्ंस्थानच्या इतिहासात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या बाणायत ह्या तिसर्‍या महिला अधिकारी आहेत. पहिल्या अधिकारी म्हणून लेखा पाठक, दुसर्‍या अधिकारी म्हणून रूबल अग्रवाल यांनी काम पाहिले. तर आता तिसर्‍या महिला अधिकारी म्हणून आता नागपूरच्या भाग्यश्री बाणायत ह्या काम पहाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com