साई संस्थानवर आयएएस अधिकारी नेमल्यामुळे अवमान याचिका निकाली

साई संस्थानवर आयएएस अधिकारी नेमल्यामुळे अवमान याचिका निकाली
साई

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थानवर (Sai Baba Trust) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) आयएएस अधिकारी (IAS Officers) नेमल्यामुळे औरंगाबाद उच्च न्यायालयात (Aurangabad High Court) दाखल केलेली अवमान याचिका निकाली काढण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. अजिंक्य काळे (ADVT Ajiky Kale) यांनी दिली.

याबाबत प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने तदर्थ समिती स्थापन केली होती. साईबाबा संस्थान ट्रस्टचे आज रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर (ahmednagar), साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Sai Baba Trust CEO) , अतिरिक्त विभागीय आयुक्त, नशिक (Nashik) व सह धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांची तदर्थ समिती धोरणात्मक व आर्थिक निर्णय उच्च न्यायालयाच्या परवानगीने घेत आहे. सदर समिती ऑक्टोबर 2019 पासून साईबाबा संस्थानचा कारभार सांभाळत आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे (Kanhuraj Bagate) आयएएस अधिकारी (IAS Officers) नसताना त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

दरम्यान श्री बगाटे यांची आयएएस केडरमध्ये पदोन्नती झाली. श्री. बगाटे यांच्या नेमणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशप्रमाणे सरळ नेमणुकीच्या आयएएस अधिकार्‍याची साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दि. 19 मार्च 2021 रोजी दिले होते. आजवर 4 महिने उलटून देखील सनदी आयएएस न नेमल्यामुळे याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांनी प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग व विधी, न्याय विभाग यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.

काल दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी सरकारी वकील अ‍ॅड. डी. आर. काळे यांनी श्री. बगाटे यांच्या जागी भाग्यश्री बाणायत यांची बदली झाली असल्याचे दि. 1 सप्टेंबर 2021 रोजीचे पत्र न्यायालयात सादर केले. सदर पत्राचे अवलोकन करत उच्च न्यायायालयाच्या आदेशाचे पालन झाले आहे अशी नोंद करत न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर. एन. लड्ढा यांनी सदर अवमान याचिका निकाली काढली. सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिंक्य काळे, अ‍ॅड. उमाकांत आवटे, अ‍ॅड. राजेश मेवारा यांनी काम पाहिले तर शासनाच्यावतीने अ‍ॅड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com