मुसळधार पावसाने साईबाबा मंदिराच्या मुखदर्शनाजवळील मंडप कोसळला

मुसळधार पावसाने साईबाबा मंदिराच्या मुखदर्शनाजवळील मंडप कोसळला

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी (Shirdi) शहरात मंगळवारी दुपारी मुसळधार पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावल्याने श्री साईबाबा मंदीराच्या (Shri Sai Baba Temple) मुखदर्शनाजवळील मंडप (Pavilion) मुसळधार पावसामुळे अचानकपणे कोसळला (Collapsed) असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र अशाप्रकारची हि दुसरी घटना घडल्याने याविषयी साईसंस्थानने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी साईभक्तांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान मंगळवार दि.21 जून रोजी शिर्डीत (Shirdi) दुपारी वादळी वार्‍यासह दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे साईमंदिर परिसरातील मुखदर्शनलगत असलेला मंडप कोसळला (Pavilion Collapsed). पावसाच्या पाण्याचे वजन न पेलवल्याने सदरचा मंडप खाली पडला असून यात सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कडक उन्हापासून भाविकांना सावली मिळावी यासाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिर (Sai Baba Temple) परिसर आणि भाविकांचा वावर असलेल्या ठिकाणी साईसंस्थानकडून प्रशासनाकडून मंडप टाकण्यात येतो. यात समाधी मंदिर परिसर, महाव्दार क्रमांक तीन, पाच, चार आदी ठिकाणी ठेकेदाराकडून मंडप टाकण्यात येतो.

सदरच्या मंडपावर पावसाचे पाणी साचले होते त्यामुळे पाण्याच्या वजनाचा भार वाढला आणि मंडप खाली कोसळला. यावेळी मंडपाखाली कोणीही नसल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. या दुर्घटनेची भाविकांना जाणीव होताच त्यांनी तेथून प्रवेशद्वार क्रमांक तिनजवळ पलायन करुन आसरा घेतला. यापूर्वी देखिल साईसंस्थानच्या प्रवेशद्वार क्रमांक चार येथिल मंडप कोसळ्याची घटना सर्वश्रृत आहे. अनेक वेळा मंडप खाली पडतो, कधीकधी कापडे फाटतात. मंडप पडण्याच्या अशा घटना वारंवार होत असल्याने साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने यासंदर्भात कायमस्वरुपी तोडगा काढवा अशी अपेक्षा भाविक तसेच शिर्डीकरांकडून व्यक्त केली जात आहे.

साईसंस्थानकडून दरवर्षी कंत्राटी पद्धतीने देण्यात येणार्‍या मंडप संदर्भात अनेकवेळा साईभक्त आणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे कारण असे आहे की, साईसंस्थान दरवर्षी मंडपासाठी लाखो रुपयांचे टेंडर काढते. त्यापेक्षा संस्थाननेच स्वताच स्वतंत्र मंडप विभागाची निर्मिती करून हा पैसा वाचवण्यासाठी प्रयत्न का करत नाही. संस्थानकडे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु यावर संस्थान तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत असमर्थ ठरले आहे. त्यामुळे साईबाबांच्या झोळीतील पैसा वाचवण्यासाठी अजूनही वेळ गेली नाहीये याचा संस्थान प्रशासनाने विचार करावा.

- नितीन अशोक कोते, सामाजिक कार्यकर्ते शिर्डी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com