साईसंस्थानच्या जनसंपर्क अधिकारी नियुक्तीस विलंब ?

तातडीने बहुभाषिक अधिकारी नियुक्त करावा; साईभक्तांची मागणी
साईसंस्थानच्या जनसंपर्क अधिकारी नियुक्तीस विलंब ?

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

देशातील श्रीमंत देवस्थान (Temple) म्हणून नावलौकीक प्राप्त केलेल्या शिर्डी (Shirdi) येथील श्री साईबाबा संस्थानच्या (Shri Sai Baba Sansthan) जनसंपर्क कार्यालयातील सात ते आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती करण्यासाठी विलंब होत असून याजागी बहुभाषिक आणि मुखात रसाळ वाणी असलेल्या व्यक्तीस जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी साईभक्तांनी केली आहे.

जगभरात श्रद्धा व सबुरीचा संदेश देणार्‍या श्री साईबाबांच्या (Shri Sai Baba) नगरीत श्री साईसंस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात तत्कालीन जनसंपर्क अधिकारी स्व. मोहनराव यादव यांच्या जागेवर साईसंस्थानचे वतीने (Sai Sansthan) अद्यापही पदाला साजेसा जनसंपर्क अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली नसल्याने देशविदेशातून येणार्‍या भाविकांना भाषेच्या अभावामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्वर्गीय यादव यांचा साईबाबांचा प्रचार तसेच प्रसार करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान आहे. सध्या साईसंस्थानचा कारभार हाताळण्यासाठी नवीन विश्वस्तांची नियुक्ती केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत (CEO Bhagyashree Banayat) या देखील संस्थान कर्मचार्‍यांकडून शिस्तबद्ध कामकाज करून घेण्यासाठी सातत्याने लक्ष देऊन आहे.

देशविदेशातून सर्वधर्माचे करोडो भाविक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी साईनगरी शिर्डी येथे येत असतात. त्यांना मराठी भाषा समजत नसल्याने डोनेशन देण्यासाठी तसेच साईसंस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती प्राप्त होण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पीआरओ कार्यालयात जनसंपर्क अधिकार्‍यास प्रत्येक भाषेचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे.सध्या सदरचे पद रिक्त असल्याने त्या जागेवर जर्नालिझमचा पदवीधर याबरोबरच इंग्रजी भाषा बोलण्यात माहिर असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात आले पाहिजे. जेणेकरून भक्तांची भाषेअभावी होत असलेली फरफट थांबेल आणी साईसंस्थानला देखील यामाध्यमातून मदत होईल. साईभक्तांना चांगल्या प्रकारे सुविधा, उत्तम दर्शन, तसेच सातासमुद्रापार पोहचलेले साईबाबांचे सेवाभावी कार्य पटवून देण्यासाठी कुशल बहुभाषिक जनसंपर्क अधिकार्‍याची नेमणूक तातडीने करावी, अशी मागणी दस्तुरखुद्द साईभक्तांनी केली आहे.

श्री साईचरीत्राचा गाढा अभ्यास आणि माहिती त्याचबरोबर इंग्रजी, हिंदी, मराठी या तिन्ही भाषेवर प्रभुत्व असणार्‍या व्यक्तीला जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता साईभक्तांची होणारी अडचण तातडीने संस्थान प्रशासनाने दूर करावी.

- सचिन शिंदे, शिर्डी शहराध्यक्ष भाजप

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com