गंगागिरी महाराज सप्ताहातून सेवाभाव - रामगिरी

गंगागिरी महाराजांचे वारकरी सांप्रदायात सर्वात मोठे काम || श्रीक्षेत्र कोकमठाण सप्ताहाचे ध्वजारोहण !
गंगागिरी महाराज सप्ताहातून सेवाभाव - रामगिरी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज यांचे महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायात सर्वात मोठे काम आहे. लोककल्याणासाठी त्यांनी अनेकांना परमार्थात आणले. सराला बेट आध्यात्मिक उर्जा केंद्र आहे, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले. योगिराज गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहातून सेवाभाव मिळतो, असेही ते म्हणाले.

श्रीक्षेत्र कोकमठाण येथे 2 ते 9 ऑगस्ट दरम्यान होत असलेल्या सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी आ. आशुतोष काळे, संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, रमेशगिरी महाराज, देवकिनंदन महाराज, मधुकर महाराज, काका कोयटे, नागेबाबा मल्टिस्टेटचे कडूभाऊ काळे, लक्ष्मीमाता दूधचे बाबासाहेब चिडे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, कमलाकर कोते, नंदकुमार गोंदकर, तुकाराम गोंदकर, सुदर्शन वाहिनीचे सुरेश चव्हाणके, गंगापूरचे संतोष जाधव, अविनाश गलांडे, दत्तू खपके, वैजापूरचे बाळासाहेब संचेती, दिनेश परदेशी, नंदकुमार संचेती, सप्ताह समितीचे अध्यक्ष सुधाकर रोहोम, संभाजी रक्ताटे, सरपंच उषा दुशिंग, उपसरपंच दीपक रोहोम, जंगली महाराज ट्रस्टचे श्री. भोंगळे, संजय काळे, नवनाथ मेहेत्रे यांचेसह कोकमठाण पंचक्रोशी तसेच नगर, नाशिक, व औरंगाबाद जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योगिराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला पावणेदोनशे वर्षांची परंपरा आहे. सप्ताहाची जबादारी निव्वळ कोकमठाणकरांची नाही तर ती सर्वांची आहे. सेवेमुळेच हनुमंत श्रेष्ठ ठरले. सात दिवस या ठिकाणी भक्तीरस वाहता राहील. ज्ञान आणि अन्नदान येथे आहे, असेही महंत रामगिरी महाराज म्हणाले. याप्रसंगी विवेक कोल्हे यांनी सप्ताहाला संजीवनी उद्योगसमूह काहीही कमी पडू देणार नाही, असे सांगितले. गोदावरी दूधचे राजेश परजणे यांनीही सप्ताहाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सप्ताहाचे अध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी आ. काळे यांचे चांगले सहकार्य मिळत असून 2.5 कोटींचे रस्ते त्यांनी केल्याचे सांगून पुढेही सहकार्य करेल, असे ते म्हणाले.

श्री. भोंगळे यांनी जंगली महाराज आश्रम यात सहभाग घेईल, असे सांगितले. याप्रसंगी विवेकानंद महाराज, महंत रमेशगिरी महाराज, कमलाकर कोते, सप्ताहाचे उपाध्यक्ष संभाजी रक्ताटे, शरद थोरात, सरला दिदी यांनी आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी दादासाहेब महाराज रंजाळे, मधुसूदन महाराज, नवनाथ महाराज म्हस्के, गणेश महाराज शास्त्री, नवनाथ मेहेत्रे, डॉ. विजय कोते, अरुण महाराज रोहोम, केशव भवर, अनुसया होन, साहेबराव रोहोम, शिवाजी ठाकरे, शेती महामंडळाचे अभंग, आकाश नागरे, सुभाष गमे, पी. डी. गमे, नामदेव घोरपडे, ज्ञानेश्वर टेके, काकासाहेब चिडे, संदीप पारख यांचेसह भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केले तर आभार संभाजी रक्ताटे यांनी मानले.

सप्ताहाला मदत !

संजीवनी तसेच कोळपेवाडी कारखाना व उद्योग समुहाच्यावतीने या सप्ताहास प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. ध्वजारोहण सोहळ्यात साईसेवा हेल्पींग हँडच्यावतीने सप्ताहास 2 लाख 51 हजारांची देणगी देण्यात आली. अशोक युवराज देवकर यांच्या स्मरणार्थ किरण देवकर यांनी 31 हजारांची देणगी यावेळी दिली. आ. बाळासाहेब थोरात यांच्यावतीने भटारखान्यातील साहित्य देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. कान्हेगाव येथील गोदावरी रिफायनरीच्यावतीने 7 लाख रुपये जाहीर केले. येवला तालुक्यातील डोंगरगावच्या ग्रामस्थांनी पुढील सप्ताहाची मागणी केली.

तब्बल 48 वर्षांनी हिशोब !

श्रीक्षेत्र कोकमठाण येथे यापूर्वी तीन वेळेस गंगागिरी महाराज अखंड सप्ताह संपन्न झाला आहे. आता ही चौथी वेळ आहे. 1974 साली झालेल्या सप्ताहाचा हिशोब काल महंत रामगिरी महाराजांकडे मांडण्यात आला. यावेळी खर्च किती? शिल्लक किती होती. याबाबत मोठी कुतूहलता उपस्थितीत भाविकांमध्ये होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com