72 कोटी कशाचे मागता ?

चेअरमन सुधीर लहारे यांचा पलटवार
72 कोटी कशाचे मागता ?

राहाता |प्रतिनिधी| Rahata

गणेश कारखाना कर्जमुक्त झाला आहे असे माजी अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ म्हणत असतील तर मग प्रवरा कारखाना 72 कोटी रुपये कसले मागतो आहे? माजी अध्यक्षांना फक्त शिक्क्यांचा अधिकार होता, सह्यांचा नाही त्यामुळे कदाचित या सगळ्या बाबी त्यांना अवगत नसतील, असा पलटवार गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी केला आहे.

गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना विद्यमान चेअरमन सुधीर लहारे म्हणाले, त्यांनी संचालक मंडळावर केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहे. कोणताही साखर कारखाना वित्तीय संस्थांच्या सहकार्याने चालतो, गणेश चालवायला घेतला तेव्हा सुद्धा प्रवरा कारखान्याने गणेश कारखाना गहाण ठेवून कर्ज काढलेले होते, याची कदाचित माजी अध्यक्षांना कल्पना नसेल. आज शासनाच्या सहकार खात्याच्या यंत्रणेला खोटे नाटे पत्र देऊन गणेश सहकारी साखर कारखान्याला वित्तीय पुरवठा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com