यंदा श्रावण 59 दिवसांचा, 8 श्रावणी सोमवार

यंदा श्रावण 59 दिवसांचा, 8 श्रावणी सोमवार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा श्रावण महिना खास असणार आहे. यंदाचा श्रावण 30 दिवसांचा नसून 59 दिवसांचा येणार आहे. या श्रावणात 8 सोमवार असणार यंदा नवीन विक्रम संवत 2080 मध्ये 12 ऐवजी13 महिने येत आहे. यंदाच्या वर्षी अधिकमास किंवा मलमास येत आहे. आपल्या हिंदू पंचांगात दर तिसर्‍या वर्षात एक महिना अधिकच असतो. याला अधिकमास असे म्हणतात.

आपल्या वैदिक पंचागात गणना सूर्य आणि चंद्राच्या आधारे केली जाते. चंद्राचा महिना 354 दिवसाचा तर सूर्याचा महिना 365 दिवसांचा असतो. या महिन्यात 11 दिवसांचा फरक असतो. हा 3 वर्षात 33 दिवसांचा असतो दर तिसर्‍या वर्षी एक अतिरिक्त महिना असतो त्याला अधिकमास किंवा मलमास म्हणतात.

यंदा श्रावणाचा महिना 18 जुलै पासून सुरु होणार आहे. हा श्रावण 15 सप्टेंबर पर्यंत असेल. म्हणजे यंदाचा श्रावण 59 दिवसांचा असेल. अधिक श्रावण महिना 18 जुलै पासून सुरू होईल आणि 17 ऑगस्टपासून निज श्रावण महिना सुरू होईल तो 15 सप्टेंबरला संपेल. अधिक आणि निज असे दोन श्रावण महिने असल्याने यंदा 8 श्रावण सोमवार असतील.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com