file photo
file photo
सार्वमत

नगर : श्रमिकनगर एक ऑगस्टपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

शहरातील श्रमिकनगर परिसरातील वाढलेल्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. 1 ऑगस्टपर्यंत हा परिसर सील करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी यासंदर्भात आदेश काढला आहे.

श्रमिकनगरमधील पाईपलाईन रोडकडून श्रमिकनगरमध्ये येणारा मुख्य रस्ता, पाईपलाईन रोडवरील वॉशिंग सेंटर, दक्षिणेस सागर महेसुनी यांचे घर, पश्मिचमेस कोडम यांचे घर, शेजवळ यांचे घर ते पाईपलाईन रोडकडून श्रमिकनगर रोडकडे जाणारा रस्ता प्रतिबंधित क्षेत्र राहिल.

त्याचप्रमाणे या प्रतिबंधित क्षेत्रालगत असलेला पूर्वेकडील रेणावीकर कॉलनी, प्रतिमा कॉलनी, जय बजरंग विद्यालय, दक्षिणेस खुली जागा व सपकाळ हॉस्पिटल रस्ता, पश्‍चिमेस श्रेयस कॉलनी, चिंतामणी कॉलनी, हेरंब कॉलनी, चिंतामणी कॉलनी, कुष्ठधाम रोडवरील श्रमिक बालाजी चौक, भिस्तबाग चौक, उत्तरेकडील प्रशांतनगर, पेट्रोलपंप व परिसर, मनोज भंडारी दुकान ते जगदंबा क्लॉथ पर्यंतचा परिसरचा भाग हा बफर झोन राहिल.

पाईपलाईन रोडकडून श्रमिकनगरमध्ये जाणारा रस्ता हा रहदारीसाठी खुला राहिल, असे आदेशात म्हटले आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com