मंगळापूरला अडीच एकर ऊस जळाला

मंगळापूरला अडीच एकर ऊस जळाला

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

महावितरण कंपनीच्या (MSEDCL) उच्चविद्युत वाहिनीचा पोल (Pole of high power line) ऊसावर पडून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) मंगळापूर (Mangalapur) येथील सुनिल जगन्नाथ शिंदे या शेतकऱ्याचा अडीच एकर ऊस जळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे यांचा मंगळापूर शिवारातील गट नंबर 74 मध्ये 12 महिने वयाचा ऊस पीक आहे. बुधवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास महावितरण कंपनीच्या 11 केव्हीए उच्चाविद्युत वाहिनीचा पोल कलांडून ऊसावर पडला. विद्दुत वाहिणींच्या वीज प्रवाह सुरू असलेने तारांचे एकमेकांना घर्षण होऊन शॉर्टसर्किट होऊन आग लागली व त्यात शेतात उभा आलेला अडीच एकर ऊस जळाल्याची घटना घडली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com