शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाला

शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाला

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक शिवारात दोन एकर उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या आगीमुळे संबंधित शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकर्‍यांच्या उसाला दोन वर्षांपूर्वीही आग लागली होती. त्या वेळेस ही या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. या वर्षीही ऊस जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, संजय नामदेव लोखंडे यांची जळके बुद्रुक शिवारात गट नंबर 81 मध्ये मनीषा संजय लोखंडे यांच्या नावाने शेतजमीन आहे. त्यांचा तेथे दोन एकर उसाचा फड आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता अचानक उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांचे घर्षण झाल्याने उसाच्या फडाला आग लागली होती. जेव्हा आग लागली तेव्हा उसाच्या शेतीजवळ कोणीच नव्हते. त्यामुळे आगीने उग्ररूप धारण करत अख्खा उसाचा फडच भक्ष्यस्थानी आला. यामुळे शेतकरी संजय लोखंडे यांचे प्रचंड नुकसान झाले

ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी वीजवाहक तारा जमिनीलगत लोंबकळत असलेले चित्र पाहायला मिळते. विद्यृत तारां ताण देवून दुरुस्ती केल्यास अशाप्रकारे शॉर्टसर्किट होण्याचे प्रमाण कमी होईल. मात्र, महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकर्‍यांच्या उसाचे मोठे नुकसान होत असून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, शेतकर्‍यांची अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com