शॉर्टसर्किटने धामोरी शिवारात अडीच एकर ऊस आगीत खाक

शॉर्टसर्किटने धामोरी शिवारात अडीच एकर ऊस आगीत खाक

धामोरी |वार्ताहर| Dhamori

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील शेतकरी नितीन भाऊसाहेब भाकरे व आप्पासाहेब भाऊसाहेब भाकरे यांचा धामोरी शिवारातील तोडणीला आलेला अडीच एकर ऊस शेतातून जात असलेल्या वीजवाहिन्यांच्या तारेचा शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत खाक झाला. त्यामुळे या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोंबकळत असलेल्या जीर्ण वीजवाहिन्यांमुळे शॉर्टसर्किट होत असल्याचा आरोप परीसरातील शेतकर्‍यांनी केला आहे. या वाहिन्या अनेक वर्षांपासून बदलण्याची मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे. तरीही महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने अशी घटना घडत असून, याला महावितरण कंपनीच जबाबदार आहे.

या झालेल्या नुकसानीची भरपाई वीज कंपनीने शेतकर्‍यांना द्यावी. अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. महावितरण कंपनीच्या रवंदा विभागाचे सहाय्यक अभियंता सोनवणे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. व संबंधित शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले आहे. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com