
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
विजेचे शॉर्टसर्किट होऊन सुमारे दहा एकर क्षेत्रातील उसाला आग लागली उभे उसाचे पीक जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील माळेगाव येथे सोमवारी (दि.5) दुपारी घडली. माळेगाव शिवारात शेतकरी ज्ञानेश्वर जग्गनाथ उबाळे, रामदास जग्गनाथ उबाळे, निवृत्ती जग्गनाथ उबाळे, राउसाहेब पंढरीनाथ उबाळे, रामदास पंढरीनाथ उबाळे या शेतकर्यांचा लगत असलेला 10 एकर ऊस यात जळाला.
दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शेतात असलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांमधील शॉर्ट सर्किट मुळे आगीचे लोळ उसाच्या शेतावर पडल्याने उसाच्या शेताला अचानक आग लागली, आग लागल्याचे समजताच माळेगाव ग्रामस्थांनी आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न करत शेजारील काही उसाचे पीक वाचवण्यात यश आले. परंतु 10 एकर शेतातील उसाचे वाळलेले पाचट व जोराचा वारा त्यामुळे आगीचे लोळचे लोळ हवेत दिसत होते. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अग्निशामक व पाथर्डी नगर परिषदेची अग्निशामक याद्वारे उसाला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.