पारनेरमध्ये 'महाराष्ट्र बंद'ला अल्प प्रतिसाद, पाहा फोटो

पारनेरमध्ये 'महाराष्ट्र बंद'ला अल्प प्रतिसाद, पाहा फोटो

पारनेर l तालुका प्रतिनिधी

लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या बंदीला अनेक लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. संपूर्ण राज्यात बंदला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पारनेर तालुक्यात अल्प प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्व व्यवहार सकाळी आकरा वाजेपर्यंत सुरळीत चालू होते. बंदमधुन अत्यावश्यक सेवा वगळल्या असल्या तरी इतर ही सर्व व्यापारी पेठा चालू होत्या. पारनेरसह सुपा, निघोज, टाकळी ढोकेश्वर या मोठ्या व्यापारी गावांमध्ये सर्व काही सुरळीत चालू होते. तर दुपारपर्यत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यानी फिरवून बंदचे अव्हान केले नव्हते. तर महामार्गावर सर्व वहातुक सुरळीत चालू आहे.

अगोदरच करोनाने जनजीवन विस्कळीत झाले असल्याने अशा बंदने उपासमाळीची वेळ येईल असे नागरिक बोलत होते. तर सुपा येथे काही शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले आहे. त्यासाठी कोणी रस्त्यावर उतरले नाही आणि आता राजकीय पोळी भाजण्यासाठी बंदचे अव्हान केले आहे असेही शेतकरी सुप्यात बोलत होते.

Related Stories

No stories found.