
जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari
कोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) जेऊर कुंभारी (Jeur Kumbhari) गावठाण परिसरातील शेतकरी बापुराव सिताराम वक्ते यांच्या शेतातुन जाणार्या विजेच्या तारा एकमेकांना घासुन स्पार्किंग होऊन ऊसाला आग (Sugarcane Fire) लागली. आसपासच्या नागरीकांच्या दक्षतेमुळे तीन एकर ऊस वाचविण्यात यश आले.
आग (Fire) लागल्याची घटना समोरच्या शेतात काम करणारे संतोष वक्ते यांनी पहिली व तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हि माहिती वार्यासारखी गावत पसरली. शेजारी राहणार्या शेतकर्यांनी कोणत्या क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली व आजूबाजूचे शेतकरी आग विझवण्यासाठी धावत आले. त्यामध्ये संतोष वक्ते, कर्ण वक्ते, भाऊसाहेब वक्ते, किशोर वक्ते, नानासाहेब गुरसळ, महेंद्र वक्ते, मनोहर वक्ते, धर्मा वक्ते यांनी सर्वांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी पाणी व उसाचे वाढे यांच्या साहाय्याने ऊसाला लागलेली आग विझवली. शेतकर्यांच्या प्रसंग सावधानाने बापुराव सिताराम वक्ते यांचे तीन एकर उसाचे शेत वाचले.