शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या उसाची तातडीने तोडणी

पाच शेतकर्‍यांच्या मदतीला धावून आले ज्ञानेश्वरचे व्यवस्थापन
शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या उसाची तातडीने तोडणी

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

खरडगाव येथे शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत, पाच शेतकर्‍यांचा ऊस जळून खाक झाला आहे. उसाला आग लागली हे व्यवस्थापनाला समजतात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन प्रशासनाने तत्परता दाखवून तेथील शेतकर्‍यांच्या उसाच्या तोडीसाठी टोळ्या पाठवल्या व प्रत्यक्ष ऊस तोडून गाळपासाठी आणण्याचे नियोजन केले. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना मोठा आधार मिळाला आहे.

अतिवृष्टी तसेच कोणतीही नैसर्गिक आपत्ती असेल वा शेतकरी कुठल्याही संकटात असेल तर ज्ञानेश्वर कारखाना शेतकरी हित लक्षात घेऊन नेहमीच शेतकर्‍यांच्या मागे खंबीरपणे उभा असतो. याचाच प्रत्यय या घटनेतून सर्वसामान्य शेतकर्‍यांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला आहे. शेतकर्‍यांनीही कारखाना व्यवस्थापन व प्रशासनाचे आभार मानले आहे. विरोधक नेहमीच राजकीय हेतूने कारखान्यावर टीका करत असतात मात्र कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या या मदतीतून विरोधकांच्या टीकेला चपराक बसली आहे.

1 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास शार्टसर्कीटमुळे चार ते पाच शेतकर्‍यांचा पाच ते सहा एकर ऊस जळाला. त्यानंतर कारखाना व्यवस्थापन यांच्यासोबत संपर्क केला आणि झालेल्या घटनेची माहिती देऊन त्यांनी दुसर्‍या दिवशी परिसरातील सर्व टोळ्या एकत्र करून ऊस तोडून जवळपास सर्व ऊस घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले याबद्दल ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे आभार.

- मल्हारी लवांडे, शेतकरी, खरडगाव

दुपारच्या सुमारास आमच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या असल्यामुळे त्या विजेच्या गाळ्यांचे अंतर सुमारे 300 ते 350 फूट असून तारा पूर्ण जिर्ण झाल्या असून ते काम खुप दिवसांचे असून दिवसाची लाईट असल्यामुळे त्या तारा खाली आल्या त्यांचे शॉर्टसर्किट होऊन आमच्या शेताला आग लागली व त्यात मोठी हानी झाली.

- कल्याण काकडे, शेतकरी, खरडगाव.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com