खरेदीच्या बहाण्याने 40 हजारांच्या कपड्यांची चोरी

नगर शहरातील घटना || पोलीसात गुन्हा दाखल
चोरी
चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कपड्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलांच्या टोळीने 36 हजारांच्या साड्या 9 साड्या आणि 3 हजार 300 रूपयांचे 6 टॉप असे सुमारे 40 हजारांचे कपडे चोरले. शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील चिंतामणी हॉस्पिटलजवळील श्रृतिका लेडिज शॉपीमध्ये बुधवारी (ता. 16) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मंगल राजेंद्र भवर (रा. ताठेमळा, बालिकाश्रम रस्ता) यांचे बालिकाश्रम रस्त्यावर चिंतामणी हॉस्पिटलजवळ श्रृतिका लेडिज शॉपी नावाचे दुकान आहे. बुधवारी त्या सायंकाळी दुकानात होत्या, त्यावेळेस दोन महिला आल्या. त्यांनी साड्या दाखवा, असे म्हणाल्या. त्यांना साड्या दाखवत असतानाच आणखी एक पुरूष आणि एक तृतीयपंथी असे दोघे दुकानात आले. त्यांनी सिंदूर, पावडर, परफ्युम दाखवा, असे म्हणाले.

त्यांना हे साहित्य दाखवत असताना आणखी दोन महिला दुकानात आल्या. त्यांनी टॉप घ्यायचे आहेत. असे म्हणाल्या. त्यांनी टॉप पाहण्याचा बहाणा केला. या टॉपच्या आडोशाच्या आधारे अगोदर आलेल्या दोन महिलांनी 3 हजार रूपये किंमतीच्या 9 साड्या (36 हजार), अन्य महिलांनी 6 टॉप (3 हजार 300 रूपये) चोरले. या टोळीने 39 हजार 300 रूपये किमतीचे कपडे चोरले. मंगल भवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार महिलांच्या विरोधात चोरीचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com