
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
ट्रक चालकाने विश्वासघात करुन 16 रसवंतीची मशिनरी गायब केली. हा अनुभव राहाता तालुक्यातील साकुरी येथील एका दुकानदारास आला आहे.
साकुरी येथील विनय नंदकुमार डूंगरवाल यांचे अॅग्रोराईज एंटरप्रायजेस एलएलपी ट्रेडींग कंपनी हे मशिनरीचे दुकान आहे. या दुकानाकरिता इंदोर येथील नेप्च्यून कंपनीमधून 70 रसवंती मशीनरी मागवली असता सदर कंपनीने अमरज्योती ट्रान्सपोर्ट इंदोर मधील टाटा कंपनीचा ट्रक नं. एमएच- 19 सीवाय-6713 चालक मालक वैभव घन:शाम चौधरी याचे ट्रकमधून विश्वासाने भरून साकुरी येथे डिलीवरीसाठी पाठवली असता वैभव चौधरी याने फिर्यादीचा विश्वासघात करून 70 मशिनरी पैकी 16 नग कमी पाठवून फिर्यादी विनय नंदकुमार डूंगरवाल यांचा विश्वासघात केला.
वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी टाटा कंपनीचा ट्रक नं एम एच 19 सीवाय 6713 वरील चालक वैभव घनशाम चौधरी, रा. वाघोदे खु., सावदा तालुका रावेर, जि. जळगाव याच्याविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 138/2023 भादंवी कलम 406 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिलीप तुपे करत आहेत.