श्रीरामपुरातील वृत्तपत्र विक्रेते पांडे यांच्या दुकानाला आग

श्रीरामपुरातील वृत्तपत्र विक्रेते पांडे यांच्या दुकानाला आग

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील प्रमुख वृत्तपत्र विक्रेते किशोर न्युज पेपर एजन्सीचे मयूर पांडे यांच्या बसस्थानकावरील वृत्तपत्राच्या दुकानास शनिवारी सायंकाळी आग लागली. त्यात हे दुकान भस्मसात झाले.

पांडे यांच्याकडे सर्व वृत्तपत्रांची एजन्सी आहे. त्यांचे येथील बसस्थानकावर वृत्तपत्रांचे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उष्णतेमुळे दुकानामागे असलेल्या वीज रोहित्रातील ऑइल गळती झाली. त्यामुळे आग लागली. आग लागल्याचे समजताच पालिकेचे अग्निशमन बंब व महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाचे आकाश साळवे, अनुप झरेकर, मनोज शर्मा, सतीश पवार, जनार्दन कोपनर, कांचन अमोलिक आदींनी विशेष प्रयत्न करून तासाभराने आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, पांडे यांच्या दुकानातील सर्व दैनिके, मासिके जळून खाक झाले आहे. माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगरसेवक अशोक कानडे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड, किशोर गदिया, सुनील क्षीरसागर व शहरातील सर्व पत्रकारांनी घटनास्थळी भेट दिली, दरम्यान रात्री उशिरा याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात जळीताची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Related Stories

No stories found.