धक्कादायक ! गळफास घेत महिलेची आत्महत्या
सार्वमत

धक्कादायक ! गळफास घेत महिलेची आत्महत्या

ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याच परिसरामध्ये मोठा पत्त्याचा डाव चालत असल्याची माहिती समोर येत आहे.

Nilesh Jadhav

सुपा | वार्ताहार | Supa

तालुक्यातील गाडीलगाव येथील खानेबावस्ती येथे एका ३१ वर्षीय महिलेने राहत असलेल्या कोपीमध्ये बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१८ रोजी ६ ते ८ वा. दरम्यान मयत यशोदा काशिनाथ मधे वय ३१ यांनी स्कार्पने कोपीचे आड्याचे बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला माहिती भाऊसाहेब यादव याने दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानुसार पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली चौगुले करत आहेत.

दरम्यान ही आत्महत्या कोपीमध्ये बांबूला गळफास घेऊन करण्यात आली, मात्र कोपीची उंची कमी असल्याने आत्महत्या कशी केली. आत्महत्या की घातपात पोलीस तपासात निष्पन्न होईल. मात्र ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याच परिसरामध्ये मोठा पत्त्याचा डाव चालत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत देखील आता चौकशी होईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com