श्रीगोंदा । Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा परिसरात रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी महादेव जाधव यांच्या घरावर दरोडा टाकला.

७५ वर्षीय विमल महादेव जाधव यांनी गळ्यातील व कानातील दागिने देण्यास नकार दिल्याने दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांचे दोन्ही कान तोडून कानातील दागिन्यांसह ५० हजाराचा मुद्देमाल हिसकावून नेला.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा परिसरात राहणाऱ्या महादेव जाधव यांच्या घरावर रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ३ दरोडेखोरांनी घराची कडी वाजवत दरवाजा उघडण्यास धमकावले. महादेव जाधव यांनी दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी ७५ वर्षीय विमल महादेव जाधव यांना जबरी मारहाण करत अंगावरील दागिने घेण्यास सुरुवात केली असता विमल जाधव यांनी ते देण्यास नकार दिल्याने दरोडेखोरांनी त्यांचे दोन्ही कान तोडून कानातील काढून घेतले. तसेच गळ्यातील मंगळसूत्र व चांदीचे दागिने असा एकूण ५० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत श्वान पथक बोलावण्यात आले .मात्र दरोडेखोरांचा माग मिळाला नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.