धक्कादायक : ‘कोहिनूर’चे प्रदीपशेठ गांधी यांचे निधन

धक्कादायक : ‘कोहिनूर’चे प्रदीपशेठ गांधी यांचे निधन

अहमदनगर | Ahmednagar

नगर येथील सुप्रसिद्ध कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीपशेठ गांधी यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते.

कोहिनूरच्या माध्यमातून त्यांनी नगरच्या व्यापारी वैभवात भर घातली होती. अनेक वर्षे व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत होते. शहरातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हृदयविकाराच्या धक्क्याने दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने नगरच्या व्यापारी क्षेत्राला धक्का बसला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com