धक्कादायक : रस्त्यातच झाली महिलेची प्रसुती

गरोदर महिलेला वैद्यकीय अधिकार्‍यांनी हाकलून लावले
धक्कादायक : रस्त्यातच झाली महिलेची प्रसुती

राहुरी | Rahuri

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहराला काळीमा फासणारी घटना घडली. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या सौ. कमल अरूण शिंदे या महिलेस दाखल करून घेण्यास वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ व परिचारिकांनी नकार देऊन तिची हेळसांड केली, तिला पतीसह तेथून हाकलून लावले. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला खासगी दवाखान्यात उपचारासाठी चालविले असता तिची रस्त्यातच प्रसुती झाली.

धक्कादायक : रस्त्यातच झाली महिलेची प्रसुती
लसघाबर्‍यांवर आता थेट कारवाईच !

दरम्यान, तेथील परिसरातील महिलांनी आडोसा करून तिची सुखरूप प्रसुती करून बाळ-बाळंतीणीची सुटका केली. तिने रस्त्यातच एका गोंडस कन्येला जन्म दिला. ही घटना काल गुरूवारी सकाळी देवळाली प्रवरा येथे नगरपालिका कार्यालयाजवळ सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे देवळालीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांसह आरोग्य कर्मचार्‍यांवर निलंबनाची मागणी केली आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ हे वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी असून त्यांनी यापूर्वीही अनेक रूग्णांची हेळसांड केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांची पाठराखण केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

धक्कादायक : रस्त्यातच झाली महिलेची प्रसुती
लॉकडाऊन ? नाय, नो, नेव्हर !

रिपाइंचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र थोरात यांनी संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली असून जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा थोरात यांनी दिला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद नगर जिल्ह्यात उमटले असून नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

काल गुरुवारी सकाळी 6 वाजता राहुरी फॅक्टरी येथील कमल अरूण शिंदे ही 30 वर्षीय महिला पतीसोबत देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आली. तिला प्रसुतीच्या प्रचंड वेदना होत असल्याने पती व पत्नी यांनी त्वरीत दाखल करुन घेण्याची विनंती केली. परंतु वैद्यकीय अधिकारी आलेले नसल्याने उपस्थित परिचारिका व कंपौंडर यांनी दाखल करुन न घेता वैद्यकीय अधिकारी डॉ. मासाळ यांना फोन करुन घटनेची माहिती दिली असता डॉ. मासाळ यांनी महिलेस रक्त कमी असल्याचे कारण सांगून येथून खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. खासगी दवाखान्यात जाण्याची या दाम्पत्याची ऐपत नसल्याने ते डॉ. मासाळ यांची वाट पाहत थांबले. शेवटी 9 वाजता डॉ. मासाळ आले व त्यांनी जोडप्याला रक्त कमी असल्याचे कारण सांगून खासगी दवाखान्यात जाण्यास सांगितले असता उभय पती-पत्नीने डॉ. मासाळ यांच्यासमोर हात जोडले, त्यांच्या पाया पडले पण त्यांना दया आली नाही.

धक्कादायक : रस्त्यातच झाली महिलेची प्रसुती
यावर्षी कुमारी मुला- मुलींना अन् वाघांना त्रास होणार !

मागीलवर्षी राज्य सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीकोरी रुग्णवाहिका दिलेली असताना या जोडप्याला रुग्णवाहिका न देता आल्या पावली जाण्यास सांगितले. हे जोडपे माघारी जात असताना महिलेला प्रचंड प्रसुती वेदना होऊ लागल्याने ती नगरपरिषद कार्यालयाच्या भिंतीच्या कडेला थांबली असता तिला पुन्हा वेदना होऊ लागल्या. ही घटना रिपाइं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांना समजताच ते काही महिलांसह तात्काळ घटनास्थळी आले. महिलांनी साडीचा पडदा लावून भिंतीच्या कडेला या महिलेची प्रसुती केली. या घटनेने उपस्थित महिला नागरिक संतप्त झाले. रिपाइं कार्यकर्ते व सुरेंद्र थोरात यांनी घटनेतील दोषी असलेल्या सर्वांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन केले.

यावेळी थोरात यांनी भ्रमणध्वनीवरुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड यांना माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेची माहिती देऊन डॉ. मासाळ यांच्यासह दोषींवर कडक कारवाई होऊन निलंबित करण्याची मागणी केली. यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गायकवाड या तात्काळ घटनास्थळी हजर झाल्या. डॉ. गायकवाड यांच्यासोबत रिपाइं कार्यकर्ते व डॉ. मासाळ यांच्यात चर्चा झाली असता डॉ. मासाळ यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने बाचाबाची झाली. यामुळे संतप्त रिपाइं कार्यकर्ते व नागरिक यांनी घटनेचा निषेध व्यकत केला. दोन दिवसात डॉ. मासाळ व दोषींवर कारवाई न झाल्यास या घटनेबात रिपाइंच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा रिपाइं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे. यावेळी महिला व नागरिक उपस्थित होते.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मासाळ हे गेली वीस वर्षे या ठिकाणी आहेत. मध्यंतरी त्यांची बाहेर बदली झाली होती. परंतु त्यांनी तडजोड करुन ते पुन्हा देवळालीत दाखल झाले. डॉ.मासाळ यांचा देवळाली प्रवरा बाजारतळावर स्वतःचा खासगी दवाखाना आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अन्य आरोग्य अधिकार्‍यांचेही लक्ष नसत असेे नागरिकांनी सांगितले. रूग्णांना कुठलेच औषध वेळेवर मिळत नाहीत. या डॉक्टरांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असून आरोग्य विभाग त्यांना का पाठीशी घालतो? असा सवाल रिपाइं जिल्हाध्यक्ष सुरेद्र थोरात यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com