पेट्रोल, डिझेल व गॅस भाववाढीच्या निषेधार्थ शेवगावात शिवसेनेचे आंदोलन

पेट्रोल, डिझेल व गॅस भाववाढीच्या निषेधार्थ शेवगावात शिवसेनेचे आंदोलन

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) -

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या केलेल्या भाव वाढीसाठी केंद्र सरकारचा निषेध तालुका शिवसेनेने तालुकाप्रमुख अविनाश मगरे आणि

शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन व तहसिलदारांना निवेदन देऊन केला आहे.

सध्या देशामध्ये केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची भरमसाठ केलेली दरवाढ केली आहे. शेतकरी, मध्यमवर्गीय लोकांना या महागाईच्या भस्मासुराने गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. या भस्मासुराला वेळीच आवर घातला नाही तर देशात मोठ्या प्रमाणात लोकभावनेचा प्रक्षोभ होईल व सर्वसामान्यांचे जीवन जगणे कष्टाचे होईल. या सर्वच बाबी लक्षात घेऊन शिवसेनेने राज्यव्यापी आंदोलन उभे केले आहे.

शेवगाव शिवसेना व युवासेना यांच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि.5) शेवगाव पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे निषेध, धरणे आंदोलन केले. जिल्हा संपर्कप्रमुख संजय घाडी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, जिल्हा प्रमुख दक्षिण राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन शिवसेना तालुका प्रमुख अ‍ॅड.अविनाश मगरे, शहरप्रमुख सिद्धार्थ काटे, युवासेना तालुकाप्रमुख शितल पुरनाळे, तालुका संघटक महेश पुरनाळे, चंद्रशेखर ढवळे, महिला आघाडीच्या मंदाकिनी कुलकर्णी, ज्योती केदारी, स्वाती कुलकर्णी, लता ढवळे, कृष्णा कुलकर्णी रमेश पाटील, विकास भागवत, उदय गांगुर्डे, अशोक शिंदे, विठ्ठल घुले, देविदास चव्हाण, महेश मिसाळ, सुनील जगताप, अतुल लबडे, गणेश ढाकणे, गणेश चेमटे, दुबे, गणेश पोटभरे, ज्ञानेश्वर धनवडे, अरुण काटे, अशोक गवते, कृणाल साळवे, किरण मगर, अमोल काशीद, अमोल राऊत आदींनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com