त्यांनी ‘त्या’ नगरसेवकांची नावे जाहीर करावीत

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शिंदे गटाला आव्हान
त्यांनी ‘त्या’ नगरसेवकांची नावे जाहीर करावीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेतील शिवसेनेचे आठ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना काहीही अर्थ नसून, शिंदे गटाने या नगरसेवकांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिले.

महापालिकेतील शिवसेनेचे आठ नगरसेवक शिंदे गटात येणार असल्याचा दावा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषद घेतली. गाडे म्हणाले, महापालिकेतील कोणताही शिवसेनेचा नगरसेवक शिंदे गटात जाणार नाही. त्यांच्या दाव्याला काहीही अर्थ नाही. जर खरेच जाणार असतील तर त्यांनी संबंधित नगरसेवकांची नावे जाहीर करावीत. विनाकारण अशा बातम्या पसरविण्यात येत आहेत.

जिल्हाप्रमुख (उत्तर) रावसाहेब खेवरे यांनीही खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, खा. लोखंडे यांना आता शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाही. ते शिंदे गटातही राहणार नाहीत. ते लवकरच भाजपमध्ये जातील. मात्र शिवसेनेकडे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासारखा दमदार पर्याय असल्याने खा. लोखंडे यांची आम्हालाही आता गरज नाही.

कदम यांच्या वक्तव्याचा निषेध

रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा यावेळी निषेध करण्यात आला. कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नगर शहर शिवसेनेच्यावतीने कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. त्यांचा पुतळा जाळण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com