सोनई (वार्ताहर) -

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी नववर्षाच्या पहिल्याच शनिवारी शनीशिंगणापूर येथे येऊन शनीचौथर्यावर जाऊन

शनी अभिषेक व महाआरती केली. मुळा शैक्षणिक संस्थेच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन झाले होते. नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवार निमित्त शिंगणपुरात भाविकांची दिवसभर मोठी गर्दी झाली होती.

सायंकाळची महाआरती मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते झाली. उदासी महाराज मठात नार्वेकर यांनी पत्नी मीरा नार्वेकर यांच्या सोबत शनी अभिषेक केला. नूतन विश्वस्त भागवत बानकर व आप्पासाहेब शेटे यांनी नार्वेकर यांचा सन्मान केला. सत्काराला उत्तर देताना मिलिंद नार्वेकर म्हणाले की अनेकदा दर्शनासाठी येत असतो प्रत्येक वेळेस मोठे समाधान व ऊर्जा मिळत असते.

शनी महाराजांचा महिमा हा भारतात नसून संपूर्ण जगात आहे. देशावर कोरोनाचे जे संकट आले आहे ते लवकर दूर होण्यासाठी मी प्रार्थना केली आहे. यावेळी विश्वस्त आप्पासाहेब शेटे, भागवत बानकर, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले, राजेंद्र गुगळे, माजी विश्वस्त योगेश बानकर, उपस्थित होते.