शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही - रावसाहेब खेवरे

शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही - रावसाहेब खेवरे
खेवरे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिवसेनेत 80 टक्के समाजकारण आणी 20 टक्के राजकारण या ब्रिदवाक्यास अनुसरून शिवसैनिक तळागाळातील नागरीकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, जिल्ह्यातील हाडामासाच्या शिवसैनिकाचे मनोबल वाढले पाहिजे त्यांवर अन्याय होता कामा नये यासाठी श्रद्धा व सबुरी ठेवा असा संदेश देत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना विठ्ठल पवार यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख पै.रावसाहेब खेवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

साईबाबा एम्प्लाँइज सोसायटीचे शिवसेनेचे संचालक विठ्ठल पवार यांनी संस्थान कामागारांच्या प्रश्नी प्रशासनाची विनापरवाना लोकल चँनलला मुलाखत दिल्याने साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर सोशल मीडियावर श्री पवार यांना संस्थानने याकारणास्तव साईआश्रम भक्तनिवास येथून सुपरवायझर पदावरून बदली करत थेट स्वच्छता विभागात झाडू मारण्यासाठी रवानगी केल्याने सोशल मीडियावर सदरील विषय चर्चेचा ठरला आहे.

याविषयी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख खेवरे यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की पवार यांना संस्थानने दिलेले काम त्यांनी प्रामाणिकपणे करावे मात्र ते करत असतांना माझ्या शिवसैनिकावर अन्याय झाल्यास तो कदापिही खपवून घेणार नाही. जिल्ह्यातील शिवसेना तसेच सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभे आहे. असे सांगत थोडे थांबा मग समजेल असा सुचक इशारा देखील त्यांनी दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com