शिवसैनिकांनी केडगावातील अनधिकृत नळ जोड केला बंद!

पुन्हा कनेक्शन जोडून दाखवा : मनपाला आव्हान
शिवसैनिकांनी केडगावातील अनधिकृत नळ जोड केला बंद!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ड्रीम सिटीने केडगावची मुख्य जलवाहिनी फोडून अनधिकृतपणे चार इंची नळ जोडणी केली होती. केडगावच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्याचे काम ड्रीम सिटीचे वर्षानुवर्षे सुरू होते. दुसरीकडे केडगावकरांची पाण्यासाठी ससेहोलपट चालू होती. यामुळे शिवसेना नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, सुनीता कोतकर, शांताबाई शिंदे यांनी महासभेत प्रश्न देखील उपस्थित केला होता. परंतु अधिकारी मान्य करण्यास तयार नव्हते. अखेर शिवसेना नगरसेवकांनी प्रत्यक्ष ड्रिम सिटी येथे जाऊन याठिकाणी असणारा पाण्याचा अनाधिकृत जोड तोडला.

केडगाव शिवसेना व नागरिकांच्या वतीने या प्रश्नी वेळोवेळी पत्रव्यवहार, निवेदन देण्यात आले होते. मात्र, मनपाने कोणत्याही प्रकाराचा खुलासा केला नव्हता. उलट पदाधिकारी व काही लोकप्रतिनिधींच्या मिलीभगत आशीर्वादामुळे महावीर ड्रीम सिटी वरचा कृपा आशीर्वाद होता. मात्र केडगाव पाण्यासाठी उपाशी आणि ड्रीम सिटी मात्र तुपाशी हा अन्याय शिवसेना नगरसेवक व केडगावची जनता कदापी सहन करणार नाही, असे निवेदनाद्वारे मनपाला कळवून देखील काहीही हालचाल झाली नव्हती.

केडगावकरांवर होणार्‍या पाण्यासाठीच्या अन्याया विरोधात शिवसेना नगरसेवक पठारे, येवले व सहकार्‍यांनी रस्त्यावर उतरत सदरचा अनधिकृत जेसीबीच्या साह्याने उखडून टाकले. आता भविष्यात केडगावच्या मुख्य जलवाहिनी तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला शिवसेना योग्य भाषेत उत्तर देईल, असे जाहीर आवाहन शिवसेने मनपा प्रशासनाला दिला आहे.

Related Stories

No stories found.