अहमदनगर (प्रतिनिधी) -

नगर पंचायत समितीवर सहाव्यांदा भगवा फडकला. पंचायत समितीच्या सभापती पदी सुरेखा गुंड तर उपसभापती पदी

डॉ. दिलीप पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली नगर पंचायत समितीवरील शिवसेनेचे 15 वर्षापासूनचे वर्चस्व आजही कायम राहिले. कांताबाई कोकाटे यांनी सभापती पदाचा तर रवींद्र भापकर यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडी झाल्या. सभापती आणि उपसभापती पदासाठी एकेक अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडी झाल्या.

भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी 2007 मध्ये शिवसेना-काँग्रेसची महाविकास आघाडी नगर तालुक्यात उदयास आली. एक अपवाद वगळता तेव्हापासून पंचायत समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. 2007 पासूनच्या पुढील सर्व निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने एकत्र येत लढविल्या आणि जिंकल्याही. नगर पंचायत समितीच शिवसेनेचे 7, काँग्रेसचा एक आणि भाजपचे चार असे बलाबल आहे. भाजपपेक्षा दुप्पट बलाबल असल्याने शिवसेनेचा भगवा आजही पंचायत समितीवर फडकला.