देशी विकणार्‍यांनी वाईनवर बोलू नये

खा. विखे यांना जाधव यांचे प्रत्युत्तर
देशी विकणार्‍यांनी वाईनवर बोलू नये

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासनाच्या वाईन विक्रीच्या धोरणाबाबत विरोधी पक्षाचे खासदार (MP) म्हणून राजकीय विरोध ((Political opposition) करणे ठीक आहे. परंतु वाईनचा (Wine) विषय जर आपणास पटतच नसेल तर आधी आपल्या मालकीचे दारू (Alcohol) आणि बियर (Beer) निर्मितीचे कारखाने बंद करा मगच तोंड उघडा, असा सल्ला शिवसेनेचे नगर उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव (Shivsena Nagar Deputy District Chief Girish Jadhav) यांनी खा.डॉ.सुजय विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांना दिला आहे.

सहकारी साखर कारखान्यांच्या अवसायनीतून रॉकेट नावाची देशी दारू तयार करता. त्याची चव चाखून खा. संजय राऊत यांच्यावर टीका करीत असाल तर त्याविषयी बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या संदर्भामध्ये खा. राऊत यांनी सेनेच्या मुखपत्रातून टीका केली होती. यावर माध्यमांशी बोलताना ते वाईन पिऊन लिहीत असावेत, असे वक्तव्य खा.डॉ.विखे यांनी केले होते. त्यास जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. राज्य शासनाच्या ध्येय धोरणाबद्दल भाजप खा. विखे हे नेहमीच टीका करीत असतात. सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आणि वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत चर्चेत यावे या अपेक्षेने ते बेताल वक्तव्य करतात.

मध्यंतरी खा. सुप्रिया सुळे यांनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली तरी तुमच्यात बदल नाही, हे दुर्देवी आहे. आपल्या कारखान्यांत तयार होणारी देशी दारू आपण चंद्रपूर येथे दारूबंदी असताना विकत होता. तिथली दारूबंदी उठविण्यासाठी त्यावेळी किती आकांड तांडव केलं. महाराष्ट्रात मागील काळात दुष्काळ असताना औरंगाबाद येथील बियर कंपन्यांना पाणी मिळावे व कंपन्या सुरु रहाव्यात यासाठी मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी किती खटाटोप केला हे सर्वांना माहित आहे, अशी टीकाही जाधव यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com