ना. दादा भुसे यांची शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे यांनी घेतली भेट

श्रीरामपूर तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय निर्मिती संदर्भात
ना. दादा भुसे यांची शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे यांनी घेतली भेट

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुका हा आधुनिक शेती करणारा तालुका आहे तालुक्यामध्ये उसाबरोबरच, कांदा, कापूस, सोयाबीन, तेलबिया, डाळिंब व इतर अनेक प्रकारचे उत्पादन घेतले जाते.

त्यामुळे या तालुक्यात कृषी पूरक व्यवसाय या तालुक्यात निर्माण झाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख सचिन बडधे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन केली. त्यावर ना. भुसे यांनी सकारात्मक चर्चा करून प्रस्ताव तात्काळ मंजूर करू असे आश्वासनही दिले.

श्रीरामपूर तालुक्यात जिनिंग मिल किंवा कोल्डस्टोरेज वेअर हाऊस यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे तसेच युवा सेनेचे शहरप्रमुख निखिल पवार यांच्या उपस्थितीत कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली.

हवामान व पावसाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतीमाल साठवण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे मातीमोल दराने शेतकर्‍यांना आपल्या मालाची विक्री करावी लागते,असे सचिन बडदे यांनी ना. भुसे यांच्या निदर्शनास आणू देऊन आपण आपल्या निधीमधून जिनिंग मिल किंवा कोल्डस्टोरेज च्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास शेतकर्‍यांची सोय होईल.

शेतमाल साठवून ठेवणे व योग्य भाव आल्यावर त्याची विक्री करणे तसेच येथे उत्पन्न होणार्‍या कच्च्या मालापासून पक्का माल तयार करून विकल्यास शेतकर्‍यांना अधिक फायदा होईल त्यामुळे त्यासाठी लागणारी जागा श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये उपलब्ध आहे किंवा तत्सम लागणारी जागा आम्ही उपलब्ध करून देऊ व त्यासाठी लागणार्‍या अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देऊ,असे बडदे म्हणाले.

या मागणीचा मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक विचार करून पुढील कामास लागण्याची सूचना केली व तो प्रस्ताव आम्ही तत्काळ मंजूर करून श्रीरामपूर तालुक्याला फायदा होईल, असे काम निश्चित करू,अशी ग्वाही ना. भुसे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com