शिवराज थोरात याने 24 तासांत सायकलवर केले 450 किलोमीटर अंतर पार

शिवराज थोरात याने 24 तासांत सायकलवर केले 450 किलोमीटर अंतर पार

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

जोर्वे (Jorve) येथील रहिवाशी व अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी शिवराज धनंजय थोरात (Shivraj Dhanajay Thorat) याने 24 तासांत संगमनेर ते इंदोर (Sangmner to Indore) यादरम्यानचे 450 किलोमीटरचे अंतर सायकलवर (Cycle) पार करत नवा विक्रम (New Record) केला असून या विक्रमाची नोंद केली आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या संपर्क कार्यालयात शिवराज थोरात याचा या ऐतिहासिक विक्रमाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, धनंजय थोरात, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, हरिश्चंद्र फेडरेशनचे अध्यक्ष सायकल पटू फेडरेशनचे अध्यक्ष व सायकल पटू राजेंद्र गुंजाळ, गणेश मुर्तडक, गौरव डोंगरे आदी उपस्थित होते.

शिवराजने अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल मधून इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण केले असून सोमवार दि.28 जून रोजी पहाटे चार वाजता संगमनेरमधून इंदौरकडे प्रयाण केले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, राजेंद्र गुंजाळ, धनंजय थोरात, सौ. वैशाली थोरात आदी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

पहाटे चार वाजता संगमनेर (Sangmner), सिन्नर (sinnar), नाशिक (Nashik), धुळे (Dhule), शिरपूर (Shirpur), शेंदवा (Shedva), इंदौर (Indor) असा 450 किलोमीटरचा अविश्रांत प्रवास त्याने सायकलवरून केला. यापूर्वीच्या 427 किलोमीटरचा विक्रम मोडित काढत त्याने हा विश्वविक्रम करत वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness Book of Records) जाण्याचा मान पटकावला आहे. यामुळे संगमनेरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

यावेळी शिवराज थोरात म्हणाला की, मला लहानपणापासूनच वडिलांपासून ही प्रेरणा मिळाली. काहीतरी वेगळे करून परदेशात शिकण्यासाठी जाण्याची माझी इच्छा होती. आणि सततच्या प्रयत्नातून आत्मविश्वासपूर्वक ध्येय ठेवून हा विश्वविक्रम केल्याने मला खूप आनंद झाला आहे. याच बरोबर अजून पुढे काम करत मी देशासाठी ऑलिंपिकमध्ये (Olympics for the country) पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करेल, असेही तो म्हणाला.

शिवराज यांच्या या विश्वविक्रमा बद्दल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, शरयुताई देशमुख, राजेंद्र गुंजाळ आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com