शिवजयंती...घराघरांत अन् मनामनांत

करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन
शिवजयंती...घराघरांत अन् मनामनांत

अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करत नगर शहरात आज ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

करण्यात आली. यंदा सार्वजनिक उत्सव सोहळ्यावर मर्यादा आल्याने प्रत्येक घराघरात छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध कडक केल्याने मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. चौकात चौकात छत्रपतींचा पुतळा उभा करून अभिवादन सुरू असल्याचे दिसत होते. प्रशासनाच्या नियमाला प्रतिसाद देत अनेकांनी घरातच दैवताला अभिवादन केले.

जिल्हा मराठा प्रसारक मंडळाची यंदा होणारी मिरवणूक निघाली नाही. शैक्षणिक संकुलातील सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत शिवजयंती साजरी करण्यात आली. माळीवाडा येथील छत्रपतींच्या आश्‍वरूढ पुतळ्याला शहराचे प्रथम नागरिक महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कलेक्टर राजेंद भोसले यावेळी उपस्थित होते.

....................

मर्यादेचे पालन

चौकात स्टेज उभारून त्यावर ठेवलेली महाराजांच्या मूर्तीभोवती फुलांची सजावट करण्यात आली होती. पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जात होते. गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. रस्ते भगव्या झेंड्यांनी आणि पताकांनी सजली होती. छोट्या आवाजात महाराजांची महती सांगणारे पोवाडे सुरू असल्याचे चित्र दिसून आले. मर्यादेचे पालन करत ठिकठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com