नागवडे बापूंच्या पुतळ्याचे 7 ला अनावरण

नागवडे बापूंच्या पुतळ्याचे 7 ला अनावरण

राजेंद्र नागवडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

श्रीगोंदा |प्रतिनिधी)| Shrigonda

सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे संस्थापक दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 7 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

7 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत व जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ होणार आहे .

यावेळी राजेंद्र नागवडे म्हणाले की, बापूंनी आपले संपूर्ण आयुष्य या सहकार चळवळीसाठी समर्पित केले. बापूंच्या कार्याचे चिरंतन समरण व्हावे. या उद्देशाने कारखाना कार्यस्थळावर 2 एकराच्या जागेमध्ये पूर्णाकृती पुतळ्याचा निर्णय घेतला. हे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. आता या सहकार महर्षी बापूंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण या कार्यक्रमास तालुक्यातील नागवडे कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक, कष्टकरी, शेतकरी आदींनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर, संचालक अरुणराव पाचपुते, सुभाषराव शिंदे, श्रीनिवास घाडगे ,विश्वनाथ गिरमकर , अ‍ॅड अशोकराव रोडे, शरदराव खोमणे, शिवाजी जगताप ,हेमंत नलगे, प्रा.सुनील माने, दिपकशेठ नागवडे, कैलासराव पाचपुते, आप्पासाहेब धायगुडे यांच्यासह कार्यकारी संचालक रमाकांत नाईक सिव्हिल इंजिनिअर श्री कुलांगे आदी उपस्थित होते. आभार कारखान्याचे संचालक अ‍ॅड. सुनील भोस यांनी केले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com