श्रीगोंद्याची ऑनलाईन सभा ही ठरली वादळी !

8 दिवसात एफआरपी नुसार पैसे करणार वर्ग - राजेंद्र नागवडे
श्रीगोंद्याची ऑनलाईन सभा ही ठरली वादळी !

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील स्व.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सभा ऑनलाइन झाली. ही सभा वादळी ठरली कारखाना कारभाराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.मात्र कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सभासद आणि नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. आठ दिवसात राज्य शासनाने सांगितलेली एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार. 15 ऑक्टोबरला नागवडे कारखाना सुरू होईल वेळेत कारखाना सुरू करणार असे नागवडे यांनी जाहीर केले.

नागवडे सहकारी साखर कारखाना सभा ऑनलाइन पध्दतीने झाली यात जिजाबापू शिंदे ,दीपक भोसले, संदीप नागवडे, श्रीपाद ख्रिस्ती यांच्यासह अनेक सभासद ऑनलाइन उपस्थितीत भाषण केली. जिल्हा परिषद माजी सभापती आण्णासाहेब शेलार यांच्या नंतर माजी कारखाना उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी डिसलरी बाबत प्रश्न उपस्थित केला. वीजनिर्मिती प्रकल्प उद्घाटन केले.मात्र एक वर्ष कारखाना बंद राहिला. मात्र ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही. संस्था टिकली पाहिजे गाळप क्षमता आहे मात्र गाळप त्या तुलनेत होत नाही.

घनश्याम शेलार यांनी बोलताना म्हणाले आमच्या अंगावर पूर्वी माणसे आले मात्र संस्था टिकावी म्हणून काम केले. संस्थेचे वय वाढल्यावर संस्थेच्या माध्यमातून समाजाचे हित व्हावे. दुर्दैवाने सहकारी संस्थांच्या पुढे अनेक आव्हाने आहेत. सहकारी संस्थाच्या किल्ली ज्यांच्या हातात आहे त्याचे मन मोठे असावे. आपला फोटो अहवाल मध्ये छापला नाही म्हणून आपण लहान होणार नाही. आजीतदादाच्या मुळे साखर संघात संचालक झालो. राजेंद्र नागवडे यांनी संयम ठेऊन काम करावे. बापूच्या वारस असणाऱ्या व्यक्तीने संयम ठेवला पाहिजे. केशवराव मगर यांनी मांडलेल्या सूचनाचा विचार व्हावा. इथे राजकारण होऊ नये. असे शेलार म्हणाले.

आमदार बबनराव पाचपुते म्हणाले अनेक प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष यांनी दिले पाहिजेत. तुमच्या बरोबर असलेले आता आरोप करत आहेत. बिनविरोध निवडणूक करा असे म्हणत आहेत मात्र तेच आता निवडणुकीसाठी सज्ज झाले. इथेनॉल, कोजन प्रकल्प पूर्ण करा असा सल्ला पाचपुते यांनी दिला. राजेंद्र नागवडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की कारखाना मध्ये युनियन शी चर्चा करून कारखानदारी अडचणीत असताना उसाच्या नोंदीसाठी झालेली गर्दी ही संस्थेवर विश्वास असल्याने होती. संचालक मंडळ उस तोडीत कुठला हस्तक्षेप करत नाही. संचालक मंडळ चुकीचा आरोप सहन करणार नाही. आपला ऊस देखील पट्ट्यावर आला आहे. शेलार यांचा फोटो राहिला असेल मात्र ज्याला काम करायच त्याला अनेक अडचणी येतात.

बापूच्या परंपरा प्रमाणे काम करत आहोत. कारखाना बंद होता तरी कुणाचे देणे ठेवलं नाही. 265 उस गाळप करत आहोत. ज्या सभासदानी ऊस काही वेगळ्या सभासद नावावर घातले त्याना उसाचे पैसे दिले मात्र यावरुन आरोप केले जात आहेत. शिक्षण संस्थेचा अहवाल ज्यांना पाहायचे असेल त्यांना अहवाल उपलब्ध करून दिला जाईल. किती ही रुपयांचा शेअर असला तरी सगळ्या सभासदांना मतदानाचा हक्क राहणार आहे. कुणाला वंचित ठेवणार नाही.येणाऱ्या व्याजामधून त्या त्या सभासदांचे शेअर मध्ये भर घालत आहोत.

कारण नसताना आपप्रचार करता तसे काही सभासदांनी संचालक अपात्र करण्यासाठी अर्ज दिला यात आम्ही हस्तक्षेप केला नाही.आण्णासाहेब शेलार यांनी कधी साखर कारखाना मध्ये येऊन पाहिले का जनरल मिटिंग सोडून शेलार कधी मीटिंगला आले नाहीत. आपली साखर पिवळी पडली सगळया संचालकानी गोडाऊन मध्ये साखर पाहिले मग इतरांच्या तुलनेत 13 रुपयांचा फरक पडला. टेंडर काढले त्याला शेलार आणि मगर उपस्थित नव्हते. साखर बाजार भाव अचानक पाचशे रुपयांनी वाढले. ती साखर विकली नाही. साखरेचा बाजार रोज कमी जास्त होत आहेत.

बेबनाव होईल असे आरोप करू नका. कारखान्यात कुठली अडचन नाही. कोविड काळात ग्रामपंचायतला दहा हजार दिले. कोविड सेंटर उभारले अश्या मदती केल्या.अनेक वर्षांपासून अडचणी असताना कामगार पर्मनंट केले. कारखाना मध्ये आवाहन करून सभासद वाढ केले. नागवडे कारखाना पहिल्या दोन तीन नंबरचा करणार असे नागवडे भाषणात म्हणाले. प्रस्तावित सुभाष शिंदे यांनी केले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.