हर घर तिरंगासाठी पुढाकार घ्या - कर्डिले

भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत आवाहन
शिवाजी कर्डिले
शिवाजी कर्डिले

करंजी |प्रतिनिधी| Karanji

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार असून त्यादृष्टीने पाथर्डी तालुक्यात हर घर तिरंगा लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. या उपक्रमामागे कुठलेही राजकारण नसून हा भारत देशातील प्रत्येक नागरिकांचा स्वाभिमान जागवण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तिरंगा फडकलाच पाहिज,े असे आवाहन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी येथे केले.

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा झेंडा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये घरोघरी लावण्याचे अभियान संपूर्ण देशात राबविण्याचे जाहीर केले आहे. या कालावधीत कुठे तिरंग्याचा अपमान होणार नाही तर तिरंग्याचा अभिमान वाढावा, या हेतूने हर घर तिरंगा अभियानासाठी प्रयत्न करावेत. हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन करून प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा लावण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन कर्डिले यांनी केले.

यावेळी भाजपचे दिलीप भालसिंग, बाजीराव हजारे, मनोज कोकाटे, सुभाष गायकवाड, माणिक खेडकर, जिप सदस्य पुरुषोत्तम आठरे, प स सदस्य एकनाथ आटकर, सुनील परदेशी, युवानेते कुशल भापसे, वैभव खलाटे, चेअरमन चारूदत्त वाघ, धीरज मैड, डॉक्टर नंदकिशोर नरसाळे, सरपंच बाळासाहेब आकोलकर, माजी सरपंच सुरेश चव्हाण, साहेबराव गवळी, विवेक मोरे, प्रदीप टेमकर, अशोक शिंदे, अन्सारभाई शेख, शिवाजी वेताळ, देविदास शिंदे,अमोल आगाशे, रामनाथ शिरसाट, बाबाजी पालवे, जिजाबापू लोंढे, पोपट कराळे, अशोक दहातोंडे, गणेश महाराज कुदळे, हनुमंत घोरपडे आदी उपस्थित होते.

नाव न घेता तनपुरेंवर निशान

यावेळी कर्डिले यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. निधी न मिळवता प्रसिद्धी मिळवणार्‍या लोकप्रतिनिधी सर्वांना माहित आहेत. येणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये खोटी आश्वासन देणार्‍यांचा पर्दाफाश करणार असल्याचा सूचक इशारा आ. प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com