हा तर भाजपचा भामटेपणा - झावरे

हा तर भाजपचा भामटेपणा - झावरे

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून केंद्र सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली. मात्र महाराष्ट्रातील भाजप नेते दहीहंडी उत्सव मोठा करण्याची भूमिका घेतात. मात्र याच भाजप शासित राज्यात अद्यापही मंदिरं उघडली नाहीत. मग महाराष्ट्रात मंदिरं उघडण्यासाठी आग्रह का असा सवाल करत करोनाचे सर्व नियम पायदळी तुडवून शंखनाद आंदोलन केले जाते हा भाजपाचा शुध्द भामटेपणा असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केली.

जिल्हाप्रमुख झावरे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी करोना संकट काळात राज्यात उत्कृष्ठ कामगिरी बजावत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. देशात सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारे मुख्यमंत्री म्हणून स्थान मिळवले.पंतप्रधानांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली. याच लोकप्रियतेचा भाजपला व त्यांच्या बोलक्या पोपटांना त्रास व्हायला लागला. ठाकरे यांचे काम जनते पर्यंत पोहचू नये म्हणून भाजपने पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य पदार्थ व जीवनावश्क वस्तूंचे भाव केंद्रात सत्ता असताना वाढवले व जनतेचे या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून एकाला केंद्रीय मंत्रिपदाचा तुकडा टाकला व जन आशिर्वाद यात्रा सुरू केली.

आता या मंत्र्यांचे उतरत्या वयात काय हाल झाले हे भाजपच्या नेत्यांनी अनुभवले. भाजपने वाढवलेल्या महागाईकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून रचलेला हा डाव आहे. जन आशिर्वाद यात्रेमधून जनतेचे आशिर्वाद मिळतील की जनतेचा तळतळाट, खरंतर यात्रा व आंदोलने करून राज्यात करोना वाढवण्याचे काम भाजप नेते करत आहेत. भाजपच्या या अभद्र कार्याचा हिशोब मुंबई महानगरपालिकेत जनताच करेल व त्यांची जागा त्यांना दाखवून देतील असे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com