बायोडिझेल प्रकरणात शिवसेनेचा शहरप्रमुख आरोपी

बायोडिझेल प्रकरणात शिवसेनेचा शहरप्रमुख आरोपी

अहमदनगर| Ahmedagar

अवैध बायोडिझेल तस्करी प्रकरणात (biodiesel case) शिवसेनेचा (Shivsena) शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप सातपुते हा आरोपी असल्याचे पोलिस (Police) तपासात निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्यात 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, सातपुतेसह 12 आरोपी पसार झाले आहेत. कोतवाली पोलिसांनी (kotwali police) आरोपींचा शोध सुरू केला आहे. सातपुतेचे नाव समोर आल्याने या प्रकरणात सहभाग असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर बायोडिझेल तस्करीत अनेक बड्यांचा व राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र पोलिसांकडून कासवगतीने याप्रकरणी तपास सुरु होता.

बायोडिझेल तस्करीचे नगर येथील प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर अखेर कोतवाली पोलिसांना या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करावा लागला. याप्रकरणात सातपुते याच्यासह प्रवीण गोरे याचाही सहभाग असून आणखी कोणाची नावे समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंधरा दिवसांपूर्वी नगर-सोलापूर रोडवर छापा टाकून बायोडिझेल तस्करीचा पर्दाफाश केला होता तसेच केडगाव बायपास चौकात 22 ऑक्टोबरला पहाटे पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी छापा टाकून बायोडिझेलवर कारवाई केली होती. यावेळी एकूण 52 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com