प्रमुख रस्त्यावर प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देऊ नये

शिवसेना शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांची मागणी
प्रमुख रस्त्यावर प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देऊ नये

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शहरातील जुना नगर-मनमाड रस्ता हा प्रमुख रस्ता आहे. सदर रस्त्याच्या कडेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे. त्या स्मारकासमोरील रस्त्यावर अनधिकृत, विनापरवाना, बेकायदेशीर, कोणतीही तांत्रिक मंजुरी न घेता.तसेच कोणतीही शासकीय मंजुरी न घेता कमानीचे काम सुरू आहे. त्यास मंजुरी देऊ नये, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख कलविंदर दडीयाल यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यावर सामाजिक संघटनांनी महापुरुषांच्या नावाने कमानी तसेच प्रवेशद्वार बांधण्याचे ठरविले आहे. त्यांमुळे इतर सदर किमान 20 ते 25 कमानी व प्रवेशद्वार बांधण्यात येतील. प्रत्येकाला आपली कमान इतरांपेक्षा मोठी असावी, असे वाटून त्यातून जीवघेणी स्पर्धा तयार होऊन सामाजिक सलोखा व शांतता भंग होण्याचा संभव आहे. या प्रमुख रस्त्यावर खालून कोपरगाव शहराची पिण्याची प्रमुख पाईपलाईन गेलेली आहे. तसेच हायटेन्शन इलेक्ट्रिकल वायर आहेत.त्याच प्रमाणे दूरसंचार विभागाच्या व इतर कंपनीचा मोबाइल टॉवरच्या वायरही रस्त्या खालुन गेलेले आहे.

त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी खड्डे घेऊन दुरुस्ती करावी लागते. परंतु या कामानी यांना बांधकाम परवानगी दिली तर सदर रस्त्यावरील पाण्याच्या पाइपलाइन, इलेक्ट्रिकल बवायर, मोबाईल व दूरसंचार विभागाच्या दुरुस्ती करण्यात अडचणी येणार आहे. सर्वात महत्त्वाचा म्हणजे जर शहर लगतच्या शिर्डी नगर-मनमाड हायवे वर काही कारणास्तव ट्राफिक जाम झाली किंवा अपघात झाला तर पर्यायाने शहरातील जुना नगर-मनमाड चा या प्रमुख रस्त्यावर ट्राफिक वळवावी लागते.

परंतु जर या कमानी प्रवेशद्वार झाले. तर सदरची ट्राफिक वळविता येणार नाही. शहरात सर्व जातीय धर्म यांमध्ये सामाजिक सलोखा आहे. शांतता आहे परंतु या कमानी बांधण्याच्या स्पर्धेमुळे संपूर्ण सामाजिक सलोखा शांतता बिघडू शकते व फार मोठा अनर्थ होऊन दंगल देखील होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही संघटनेला वरील प्रमुख रस्त्यावर कमान प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देऊ नये, असे निवेदन कोपरगाव शहर शिवसेनेचे शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, तहसीलदार विजय बोरुडे, पोलिस निरिक्षक वासुदेव देसले त्याच बरोबर जिल्हाधिकारी अहमदनगर पोलिस अधिक्षक यांना दिले आहे.

Related Stories

No stories found.