
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
श्री छत्रपती शिवरायांची आज जयंती असल्याने ही जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तमाम शिवप्रेमींमध्ये उत्साह राहाता तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
महाराष्ट्राचे आराध्यक्ष दैवत छत्रपती शिवरायांंच्या जयंती निमित्ताने शिवप्रेमींचा उत्साह वाढला आहे. दुचाकी, चारचाकी वाहाने यांना शिवरायांची छबीसह भगव्या पताकांचे दर्शन घडत आहे. भगव्या पतकांनी गावाच्या वेशी, ठिकठिकाणी भगव्या पताका दिसून येत आहे. काल राहाता शहरात शिवप्रेमींसाठी खास विविध भगव्या पताका, झेंडे, शिवरायांची मूर्ती, गळ्यातील माळ, सायकल लावण्यासाठीचे झेंडे, जाणता राजाची मोठे झेंडे, कानातील बाळी, लॉकेट, हातातील ब्रासलेट, स्टिकर, फोटो, शर्ट, टोपी, चंद्रकोर, घरावर लावली जाणारे झेंडे असतील आदी विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. तसेच तालुक्याच्या गावा गावांत हे चित्र आहे. आज सर्व शाळांमध्ये शिवरायांचे जयंती निमित्ताने पूजन होणार आहे. सर्वच गावांत सामूहिक पूजन होणार आहे.
देशाच्या पंतप्रधानांनी भुमिपूजन करुनही अजून मुंबई जवळील आरबी समुद्रात जागतिक दर्जाचे शिवस्मारक उभारले गेले नाही. जगभरातील शिवभक्तांची इच्छा असूनही सरकार कोणतेही आले तरी शिवस्मारकाला मुहूर्त लागेना, हा राजकर्त्यांचा नाकर्तेपणा आहे का? जर राज्यसरकारकडे शिवस्मारकासाठी पैसा नसेल तर शिवभक्तांच्या वर्गणीतून स्मारक उभारु!
- दशरथ गव्हाणे, प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य