
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यासह शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. पाथर्डी तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने काढलेल्या मिरवणुकीने पाथर्डीकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. मिरवणुकीमध्ये उंट,घोडे, हलगी पथक, ढोल पथक, शिवकालीन शस्त्र पथक,वारकरी दिंडी व अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आदींनी शिव जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शोभा वाढवली.
कसबा पेठ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीचा शहरातील प्रमुख चौकातून वाजत गाजत पंचायत समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला. सकाळी दहा वाजता तहसीलदार श्याम वाडकर यांच्याहस्ते कसबा पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, रमेश गोरे, बंडू बोरुडे, महेश बोरुडे, बबन बुचकूल, अजय भंडारी, रमेश हंडाळ, मंगल कोकाटे, मुख्याधिकारी संतोष लांडगे, बबन सबलस, बाबू बोरुडे, धनंजय चितळे, संदीप काकडे, महेश काटे आदी उपस्थित होते.
पंचायत समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले यात माजी उपसभापती विष्णूपंत अकोलकर, गट विकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, चंद्रकांत भापकर, चाँद मणियार, सिताराम बोरुडे, सोमनाथ माने, हुमायून आतार, योगेश रासने, रवींद्र पालवे, जालिंदर काटे, आकाश काळोखे, किशोर डांगे,जुनेद पठाण, मुन्ना खलिफा, सागर तरटे, जब्बर आतार आदींचा समावेश होतो. मुस्लिम बांधवांच्यावतीनेही शिवजयंतीच्या मिरवणुकीचे स्वागत केले गेले.
दरम्यान अष्टवाडा येथे आतिश निर्हाळी मित्रमंडळ व अष्टवाडा तरुण मंडळाकडून शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील तिसगाव, मिरी, येळी, साकेगाव, मिडसांगवी, हत्राळ सौदापूर या ठिकाणीही मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव धुमधडाक्यात आणि विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.