शिवजयंती मिरवणुकीत डिजे दणाणले

मंडळाच्या पदाधिकार्‍यासंह 14 जणांविरूध्द गुन्हा
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिवजयंती मिरवणूक शांततेत पार पडली असून या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मिरवणुकीत डिजे वाजविल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून डिजे साहित्य जप्त केले आहेत.

यासंदर्भात पोलीस नाईक योगेश सिताराम खामकर यांनी फिर्याद दिली आहे. कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ठाकरे गट, शिंदे गट तसेच विविध मंडळांच्या पदाधिकार्‍यांना आवाजाची मर्यादा पाळण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. मिरवणुक सुरु झाल्यानंतर डी.जे.चा आवाज क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले त्यामुळे पोलीसांनी किती डेसिबलचा आवाज आहे, याची इम्पिरियल चौकापासून तपासणी सुरु केली. पोलीस उपनिरिक्षक सुखदेव दुर्गे, हवालदार महेश बोरुडे, इस्माईल पठाण यांनी पंचासमक्ष तपासणी केली असता अखंड हिंदू समाज माळीवाडा राजाचा डी.जे. 104.7 इतक्या क्षमतेने, शिवजयंती उत्सव नालेगाव 109.0, वर्चस्व ग्रुप 112.2, हिंदू राष्ट्रसेना 110.5, शिवसेना शिंदे गटाचा डि.जे.113.9, तुळजाभवानी युवा मंच, 105.7, शिवसेना ठाकरे गट 113.7 इतक्या मोठ्या आवाजात डि.जे.वाजवून ध्वनी प्रदूषण करीत होते.

या संदर्भात पोलीसांनी मंडळाच्या पदाधिकार्‍यांना आवाजाच्या रिडींगची पावती देण्याचा प्रयत्न केला; पण पदाधिकार्‍यांनी पावती घेतली नाही. ध्वनी प्रदुषण चालुच ठेवले. त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी, डी.जे.चालक, मालक यांच्यावर भादवि कलम 188, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. संभाजी कदम (रा. माळीवाडा), संतोष शिंदे (रा. सांगळे गल्ली), दिलीप सातपुते (रा. रंगोली हॉटेल जवळ, केडगाव), संजय आडोळे, सचिन दिवटे (रा. वंजारगल्ली, मंगलगेट), निखील गहिले (रा. नालेगाव), दिनेश खरपुडे (रा. गोंधळे गल्ली, माळीवाडा) अशी मंडळाच्या पदाधिकार्‍यांची नावे आहेत तर योगेश कामटे (रा. फुरसंगी, ता. हवेली), योगेश सांडू पाटील (रा. शिवाजीनगर, पुणे), गणेश मोरे (रा. मांजरी खुर्द, ता. हवेली), गणेश चव्हाण (रा. धावडेनगर, ता. हवेली), प्रविण पाटील (रा. सावडे, कोल्हापूर),सतीश कुंजीर (रा. थेऊर, ता. हवेली), मनोज लोणकर (रा. केडगाव,ता.दौंड) अशी डिजे चालकांची नावे आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com