शिरूर तालुक्यात आठ लाखांचे अवैध तंबाखुजन्य पदार्थ जप्त

पुणे अन्न व औषध प्रशासन, शिरूर पोलिसांची कामगिरी
शिरूर तालुक्यात आठ लाखांचे अवैध तंबाखुजन्य पदार्थ जप्त

शिरूर |प्रतिनिधी| Shirur

तालुक्यातील तांदळी येथे 7 लाख 87 हजार 165 रुपये किमतींचे राज्यात विक्रिस बंदी असलेले पान मसाला, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शिरूर पोलीस व अन्न औषध प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली.

अक्षय माळी (रा.तांदळी, ता. शिरूर) व सद्दाम अन्वर शेख रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी ही कारवाई केली. संशयित दोघानी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात अवैध तंबाखु जन्य पदार्थांचा साठा केल्याची गुप्त महिती बारवकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शिरूर पोलीसांच्या मदतीने तांदळी येथील अक्षय माळी याच्या गोडावूनवर छापा टाकला.

यावेळी यामध्ये विमल पान मसाल्याचे नारंगी, निळा, जांभळा व लाल अशा रंगातील विविध प्रकारचा सुगंधी तंबाखु व पानमसाला, आर एम डी पान मसाला 209, एम सुगंधी तंबाखू 218 बॉक्स, ए - वन सुगंधी तंबाखू , हिरा पान मसाला एक्स एक्स एल 71 बॉक्स, हिरा पान मसाला एकत्र बॉक्स, रॉयल 717 सुगंधित तंबाखू 116 बॉक्स असा एकूण 7 लाख 87 हजार 165 रूपये किंमतीचा साठा आढळून आला. हे सर्व तंबाखु जन्य पदार्थ विक्रीस राज्यात बंदी असताना हा साठा करून बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.

संशयित दोघांसह या रॅकेटमध्ये कोण आहेत. याचा शोध पोलीस घेत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांच्या तक्रारीवरून संशयितांवर अन्नसुरक्षा व मानक कायदा यासह वरील आरोपींविरुद्ध भादवि 272 273, 188, 328 नुसार शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पवार हे करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com