शिरसाटवाडी, दुलेचांदगावला घरफोडी

शिरसाटवाडी, दुलेचांदगावला घरफोडी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

घराचा दरवाजाचे कुलूप तोडून कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा एंवज चोरी गेल्याची घटना पाथर्डी शहरालगत असलेल्या शिरसाटवाडी येथील साहेबराव बबनराव कोंगे यांच्या घरी घडले आहे.

साहेबराव कोंगे त्याच्या पत्नी, व मुलगा घराची कडी आतुन बंद करुन झोपले असतांना सोमवारी (दि.10) रात्री ही घटना घडली. सकाळी 6 वा साहेबराव कोंगे उठले असता त्यांना घराचा दरवाजाचा तुटलेला दिसला, तेव्हा बेड मधील कपाटातील सामानाची उचकापाचक करून त्यातील बॅगेमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने घराचे दरवाज्याचे आतिल हँड्रॉप तोडुन घरात प्रवेश केला. बेड रूम मधील दहा हजार रुपये रोख रक्कम,चौदा ग्रॅमची लक्ष्मी सोन्याचा हार, सात ग्रॅमची सोन्याची पोत, तिन ग्रॅमचे सोन्याचे कर्णफुले असा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी पसारे केली आहे. साहेबराव कोंगे यांच्या फिर्यादीवरून. अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पाथर्डी तालुक्यातील दुले चांदगाव येथेही चोरीची घटना घडली आहे. जयश्री विठ्ठल खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 11 सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरात लोखंडी पेटीचा वाजल्याचा आवाज आल्याने जयश्री खेडकर यांना जाग आली. त्यावेळी खेडकर ह्या घरातुन उठवून बाहेर पडवीत आल्या. त्यावेळी अज्ञात चोरटयांनी घरातील लोखंडी पेटी ही पडवीचे लोखंडी ग्रीलजवळ टाकली व लोखंडी ग्रीलला असलेले कुलुप तोडलेले होते. घरातील कपाटाची उचकापाचक करून त्यामधील रोक रक्कम पाच हजार रुपये व रेडमी कंपनीचा मोबाईल फोन व आधारकार्ड, व बँकेचे पुस्तक चोरुन नेले. खेडकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com