शिरसगाव उपबजार समिती जागेचा करार करण्यास टाळाटाळ

तिळवणीतील जागा पेट्रोललाईन जवळ असल्याने धोकादायक
शिरसगाव उपबजार समिती जागेचा करार करण्यास टाळाटाळ

कोपरगाव |प्रतिनिधी |Kopargav

कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबजार समिती शिरसगाव येथे आहे. बाजार समितीने शिरसगाव उपबजार मार्केटसाठी तीळवणीत जागा खरेदी केली आहे. परंतु ती खरेदी केलेली जागा धोकादायक आहे. त्या जागे शेजारून पेट्रोल पाईपलाईन गेली असल्याने पेट्रोल लाईनची कधी गळती होईल याचे काही सांगता येणार नाही.

शिरसगाव उपबजार समितीसाठी कायमस्वरूपी जागा नाही. अशी ओरड होत होती. शिरसगाव येथील विनोद भागवत यांची कोपरगाव वैजापूर मार्गालगत जागा असल्याने ती जागा शिरसगाव उपबजार समितीसाठी देण्यास तयार आहे. कोपरगाव बाजार समितीचे पदाधिकारी जागेची पाहणी करून गेले आहे. पण त्या जागेत उपबजात समिती स्थापन करण्यास टाळाटाळ करत आहे.

सध्या बाजार समिती शिरसगाव आठवडे बाजारात कांदा लिलाव करत आहे. काही वर्षे करार तत्वावर लिलाव भरवण्यात आला. पण काही महिन्यांपासून शिरसगाव-सावळगाव ग्रुप ग्रामपंचायतिचे भाडे बाजार समितीने थकवले आहे. पुढील करार पण केला नसल्याने लवकरच करार करून कांदा लिलाव करावा अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी करत आहे. पदाधिकारी बाजार समिती इतरत्र हालविण्याचा प्रयत्न करीत आहे.

त्यामुळे शिरसगाव येथील हॉटेल व्यावसायिक, छोटे मोठे उद्योग धंद्यावाले उध्वस्त होतील. शिरसगाव येथील रोजगार बेरोजगार होतील व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. म्हणून ती खरेदी केलेल्या जागेत उपबजात समिती न स्थापन करता कोपरगाव वैजापूर या मार्गालगत शिरसगाव याठिकाणी जागा खरेदी करावी. शिरसगावात उपबजार समिती स्थापन होणार या आशेने व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, यांनी जागा खरेदी केली आहे.

त्याच जवळ काही अंतरावर नवीन पेट्रोल पंप तयार होत असल्याने कांदा विक्री शेतकर्‍यांची पेट्रोल, डिझेल यांची जवळच सोय उपस्थिती होत असल्याने चिंता मिटली आहे. तीळवणीत उपबजार समितीसाठी खरेदी केलेली जागा नियमबाह्य आहे. तरी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शिरसगाव उपबजार समिती तीळवणीत पेट्रोल पाईपलाईन शेजारी न स्थापन करता. शिरसगाव येथील शेतकरी विनोद भागवत देत असलेल्या जागेत स्थापन करावी अशी मागणी शिरसगावचे व्यापारी, ग्रामस्थ, व्यावसायिक कांदा उत्पादक शेतकरी करत आहे.

कोपरगाव बाजार समिती पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली आहे. तर 2 ते 3 संचालकांच म्हणणे आहे की आपआपल्या जागेत जावू. तरी पुन्हा एकदा शिरसगाव येथील जागेचा विचार करून लवकरच तोडगा काढू . तीळवणीत घेतलेल्या जागेत पेट्रोल पंप उभारण्याचे उद्दिष्ट आहे.

- संभाजी रक्ताटे, सभापती कोपरगाव बाजार समिती

शिरसगाव येथे आठवडे बाजारात कांदा लिलाव होत आहे. पण कोणताही करार केला नसल्याने ग्रामपंचायतीस कोणतेही भाडे मिळत नाही. तरी लवकरात लवकर करार करावा.किंवा योग्य जागेत म्हणजे विनोद भागवत देत असलेल्या जागेत उपबजार समिती स्थापन करावी.

- मंगल उकिरडे, सरपंच शिरसगाव ग्रामपंचायत

शिरसगावात उपबजार समिती स्थापन होणार या हेतूने हॉटेल व्यावसायिक, व्यापारी यांनी जागा खरेदी केली आहे. उपबजार तीळवणी येथील जागेत गेल्यास व्यावसायिक अडचणीत येतील तीळवणी येथील जागेजवळून पेट्रोल लाईन गेल्याने ती धोकादायक आहे. कधीही जीवित हानी होवु शकते.

- नवनाथ भुजाडे, हॉटेल व्यावसायिक

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com