शिर्डीत तरुणाचा प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न

तरुणावर गुन्हा दाखल
शिर्डीत तरुणाचा प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरात प्रेम प्रकरणातून ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करून प्रतिष्ठित घराण्यातील

मुलीला व तिच्या वडिलांना इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केला असल्याने याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात सार्थक वसंत बनसोडे (वय 20) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली.

शिर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सार्थक वसंत बनसोडे (वय 20), रा. साकुरी, ता. राहाता याने शिर्डीतील एका मुलीच्या घरी येऊन स्वतः आत्महत्या करण्याचा तसेच मुलीसह तिच्या वडिलांना मिठी मारून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये सार्थक बनसोडे, मुलगी तसेच तिचे वडील तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी सार्थक वसंत बनसोडे याच्या विरोधात भादंवि कलम 307 तसेच पोलिसांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल भादंवि कलम 309 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com