शिर्डीत तरुणास बेदम मारहाण

10 जणांविरुध्द गुन्हा दाखल
शिर्डीत तरुणास बेदम मारहाण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथे कालिकानगर भागात साई भराटे याच्याबरोबर झालेल्या वादाच्या कारणावरुन एका तरुणास

दहा जणांनी लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करुन खिशातील 2 हजार रुपये रोख व पाकीट व आधार कार्ड काढून घेतले. घरात घुसून आई व भाऊ यांना वाईट वाईट शब्दात शिवीगाळ केली. घरातील सामानाचे नुकसान केले. बॅट व दगडाने मारहाण केली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालिकानगर भागात राहणारा तरुण विद्यार्थी विनोद गणेश गायकवाड (वय 20) याला सुमारास 10 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून साई भराटे याच्याबरोबर झालेल्या वादाच्या कारणावरुन लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करुन खिशातील 2 हजार रुपये रोख व पाकीट व आधार कार्ड काढून घेतले. घरात घुसून आई व भाऊ यांना वाईट वाईट शब्दात शिवीगाळ केली. घरातील सामानाचे नुकसान केले. बॅट व दगडाने मारहाण केली. मित्र आवेज पठाण यालाही मारहाण केली. तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात विनोद गणेश गायकवाड या विद्यार्थ्याने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी मारहाण करणारे आरोपी सागर अशोक पवार, साई किरण साना, उर्फ राठोड, पवन सुभाष बागडे, शुभम राजेंद्र घोडे, साईल राजेंद्र आव्हाड व इतर पाच सर्व रा. कालिकानगर, शिर्डी यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिसात भादवि कलम 451, 427, 327, 324 332, 504, 506, 143, 147, 148, 149, प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला. डिवायएसपी सातव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोनि लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गंधाले हे पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com