शिर्डीत 15 जानेवारीपर्यंत मतदारयादी शुध्दीकरण मोहीम

मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी दक्ष रहावे - प्रांताधिकारी
शिर्डीत 15 जानेवारीपर्यंत मतदारयादी शुध्दीकरण मोहीम

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपालिका हद्दीत 15 जानेवारी 2023 पर्यंत मतदान यादी शुद्धीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी मतदार केंद्रीयस्तरीय अधिकार्‍यांनी दक्ष राहून कामकाज करावे, असे आवाहन शिर्डी उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.

शिर्डी नगरपालिका हद्दीतील मतदान केंद्रस्तर अधिकार्‍यांची बैठक नगरपालिका सभागृहात श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. राहाता तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कुंदन हिरे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नायब तहसीलदार विकास गंबरे व सुधाकर ओहोळ यावेळी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, आता दर तीन महिन्यांनी मतदार याद्यांचे प्रकाशन होणार असल्याने बीएलओ यांनी दक्ष राहून कामकाज करावे. आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्याने याद्या बिनचूक असणे आवश्यक आहे. यासाठी बीएलओसोबत नगरपालिका कर्मचारी यांची यादी भागनिहाय नियुक्ती करून विशेष मोहीम स्वरूपात मतदार यादी पडताळणी 15 जानेवारीपर्यंत करण्यात यावी.

राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी या मोहिमेसाठी बीएलओंना सहकार्य करावे. यासाठी बीएलओंसोबत आपला एक प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात यावी. विशेष मोहिमेनंतर यादीबाबत हरकती ऐकून घेण्यात येणार नाहीत, असे आवाहनही प्रांताधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे. मतदार यादीबाबत प्राप्त तक्रारी, आधार व मतदार ओळखपत्र संलग्नीकरण कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.

शिर्डी हद्दीतील काही मतदार स्थलांतरित झाले असून त्यांची नावे पडताळणी करणे, दुबार नावे तपासणी, मयत नावे वगळणे या कामांचा आढावा घेण्यात आला. युवा मतदार, नवीन नाव नोंदणी, नाव अथवा इतर तपशील बदल याबाबत दुरुस्ती करावी,अशा सूचना उपविभागीय अधिकार्‍यांनी बीएलओंना यावेळी दिल्या.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com