File Photo
File Photo

शिर्डीतील जुन्या व नवीन भाजी विक्रेत्यांच्या दोन गटांत वाद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीतील पिंपळवाडी रोडवर अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्सशेजारी असलेल्या नगरपंचायतीच्या मंडईत जुन्या व नवीन भाजी विक्रेत्यांच्या दोन गटांत चांगलेच वाद निर्माण झाले.

मात्र नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी मध्यस्थी करत या मंडईची डागडुजी व स्वच्छता करून सुशोभित सर्वांना पुरेल अशी जागा निर्माण करून जुने व नवीन वाद मिटविणार असल्याचे सांगितल्यावर या वादावर पडदा पडला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपासून भाजी विकेे्रेते व ग्राहक यांच्यात सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे म्हणून शिर्डीतील पिंपळवाडी रोडवरील अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांना कालिकानगर येथील बाजारतळावर भाजी विक्रीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपासून पिंपळवाडी रोडवरील अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या भाजी मंडईच्या ठिकाणी काही नवीन भाजी विक्रेेते तेथे भाजी विक्री करू लागले.

काही जुन्या लोकांनी तेथे येऊन भाजी बाजार भरविण्याचा घाट घातला. त्यामुळे नवीन व जुने असे भाजी विक्रेते असा वाद निर्माण होऊन दोन गट पडले. हा वाद चिघळण्याच्या परिस्थितीत असताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, सुजित गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय जगताप, नितीन शेजवळ, अविनाश शेजवळ, अलका शेजवळ यांनी त्याठिकाणी जाऊन जुना व नवीन भाजी विक्रेते असा वाद संपुष्टात आणला.

पिंपळवाडी रोडवरील भाजी मंडईची दुरुस्ती होऊन स्वच्छता होत नाही तोपर्यंत सर्व भाजी विक्रेत्यांनी आपला भाजीपाला व्यवसाय हा कालिकानगर येथील बाजारतळावर करावा. याठिकाणी कोणीही भाजी विक्री करू नये. सगळ्या भाजीपाला विके्रत्यांना याठिकाणी बसण्याची व्यवस्था केली जाणार असून कोणीही नवीन किंवा जुना असा वाद निर्माण करू नये, असे आवाहन नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com