शिर्डीत भाजीपाला मार्केटचं पुन्हा विकेंद्रीकरण करा
सार्वमत

शिर्डीत भाजीपाला मार्केटचं पुन्हा विकेंद्रीकरण करा

नागरिकांची मागणी; एकाच ठिकाणी गर्दी होणार असल्याने करोनाचा संसर्ग वाढण्याची भिती

Arvind Arkhade

शिर्डी|प्रतिनिधी|Shirdi

राज्यात बहुतांश ठिकाणी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव भाजी मार्केट येथून पसरण्याचं निदर्शनास आले आहे. शिर्डी नगरपंचायतीन लाँकडाऊन पूर्वी शहरातील भाजी मार्केटचं विकेंद्रीकरण केलं. उपनगरात सोशल डिस्टस्निगंचे नियमानुसार भाजी विक्रेत्यांना भाजी विक्री करण्याची परवानगी दिली होती. मात्र आता पुन्हा एकाच जागेवर भाजीपाला मार्केट सुरू करण्याचा घाट नगरपंचायतच्या प्रशासनाचं घातला आहे. मात्र शिर्डीत भाजीपाला मार्केटचे पुन्हा विकेंद्रीकरण करा अशी मागणी नागरिकांनी केली.

राज्यात लाँकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहे. नागरिक दैनदिन गरजांसाठी घराबाहेर पडत असून करोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शिर्डी शहरात नगरपंचायतीच्यावतीने लाँकडाऊन घोषित होताच मध्यवर्ती भागात असलेल्या भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण केल होतं. त्यामुळे शहरात करोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी मोठी मदत मिळाली होती.

राज्यासह जिल्ह्यात काही प्रमाणात लाँकडाऊन शिथिल झाला असला, तरी देखील करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी नगरपंचायतने एका ठिकाणी भाजी मार्केट भरविण्याचे आदेश दिले असल्याने, शहरातील नागरिकांना भाजी घेण्यासाठी एकाच ठिकाणी यावे लागत आहे. याठिकाणी भाजी विक्रेत्यांकडून तसेच घेणार्‍याकडून मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकाच ठिकाणी गर्दी होणार असल्याने करोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी भिती निर्माण झाली आहे. मागे संसर्ग रोखण्यासाठी भाजी मार्केट बंद करण्यात आले होते. पर्यायी सुविधा म्हणून शहरातील प्रत्येक उपनगरामध्ये अधिकृत भाजी विक्रेत्यांची नेमणूक करुन दिली होती. त्या त्या भागातील नागरिक त्याच भागात भाजीपाला खरेदी करत असतं.

मात्र आता नगरपंचायतीच्या निर्णयामुळे एकाच ठिकाणी जास्त नागरिकांची गर्दी होवू लागली आहे. करोना विषाणु संसर्ग कमी होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच शहरातील उपनगरात सोशल डिस्टस्निगंचे नियमानुसार भाजीपाला विक्री सुरू ठेवावी. त्यामुळे नागरिक शहरात इतरत्र फिरणार नाही. नागरिकांना घरपोहच भाजीपाला सुविधा मिळत होती तर त्याच बरोबर शेतकर्‍यालाही दोन पैसे जादा मिळत.ताजा आणि शुद्ध भाजीपाला घरीच किंवा शेजारीच मिळाल्यानं नागरिक शहरात एका ठिकाणी जमा होत नव्हते.

शिर्डी शहरात करोनाचा एकही रुग्ण नव्हता मात्र निमगांव येथील भाजी विक्रेत्या महिलेच्या संपर्कामुळं येथील नागरिक बाधित झाले. शहारात कोरोना बाधितांना आकडा सध्या सहावर जावून पोहचला आहे. त्यात आता भाजी मार्केट मध्ये व्यापारी मास्क न लावताच भाजी विक्री करताना दिसून येत आहे. एकीकडे करोना बाधितांची संख्या वाढत असतांना आता नगरपंचायतच्या अधिकार्‍यांनी नवीन शक्कल लढवतं एकाच ठिकाणी भाजीपाला मार्केट सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com